Wednesday , March 4 2026
Breaking News

नेशन बिल्डर अवार्डने एस. एस. हजारे सन्मानित

Spread the love

 

निपाणी (वार्ता) : बेनाडी (ता.निपाणी) येथील रहिवासी आणि पन्हाळा तालुक्यातील सावर्डे (सातवे) भागीरथी रामचंद्र यादव हायस्कूलचे विज्ञान विषयाचे शिक्षक एस. एस. हजारे यांना कोल्हापूर रोटरी क्लब रॉयल्स तर्फे ‘नेशन बिल्डर’ पुरस्कार घेऊन सन्मानित करण्यात आले.
हजारे यांनी आतापर्यंत ज्ञानदानासह विज्ञान आणि अंधश्रद्धा या विषयावर विविध ठिकाणी व्याख्यान दिली आहेत. याशिवाय विज्ञानातील विविध प्रयोग सादर केले आहेत. अनेक ठिकाणच्या विज्ञान साहित्य संमेलनात त्यांनी सहभाग घेऊन विद्यार्थ्यासह ग्रामस्थांना मार्गदर्शन केले आहे. पर्यावरणाबाबतही त्यांनी प्रबोधनांसह वृक्ष लागवडीचे महत्त्व पटवून दिले आहे. त्यांच्या या कार्याची दाखल घेऊन तकोल्हापूर येथे आयोजित कार्यक्रमात रोटरीचे जिल्हा प्रांतपाल नासीर बोरसद्वाला व कोल्हापूर जिल्हा परिषदेचे मुख्याधिकारी संतोष पाटील यांच्या हस्ते हजारे यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यामुळे त्यांचे बेनाडी आणि परिसरात कौतुक होत आहे.

About Belgaum Varta

Check Also

निपाणी परिसरात होळीचा सण भक्तीभावाने

Spread the love  आता सर्वांनाच रंगपंचमी सणाची आतुरता निपाणी (वार्ता) : शहर, उपनगर आणि ग्रामीण …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *