
निपाणी (वार्ता) : बोरगाव येथील भाजपा कार्यकर्ता तर्फे खासदार अण्णासाहेब जोल्ले यांच्या ६१ व्या वाढदिवसानिमित्त बोरगाव येथे आयोजित जनरल बैलगाडी शर्यतीत शिवनाकवाडी येथील राहुल आरगे यांची बैलजोडीने प्रथम क्रमांक पटकाविला. त्यांना खासदार अण्णासाहेब जोल्ले यांच्या हस्ते २५ हजारांचे बक्षीस व निशाण देण्यात आले.
गावकामगार पाटील सुनील नांगरे- पाटील यांनी शर्यतीचे उद्घाटन केले. वाढदिवसाचे औचित्य साधून भाजप कार्यकत्यांनी खासदार अण्णासाहेब जोल्ले यांचा नागरी सत्कार केला. माजी नगरसेवक बाबासाहेब चौगुले यांनी स्वागत केले. शरद जंगटे यांनी मनोगत व्यक्त केले.
जनरल बैलगाडी शर्यतीत संभाजी खरात -सांगली, हैदरआली मुजावर- हातकणंगले यांच्या गाडीने व्दितीय व तृतीय क्रमांक मिळविले. त्यांना १५ हजार, १० हजाराची बक्षीस व निशाण दिले. जनरल घोडागाडी शर्यतीत गब्बर प्रेमी-बोरगाव, लग्नामन्ना व्याकुड, सोन्या प्रेमी-बोरगाववाडी यांच्या घोडागाड्यांनी प्रथम ते तृतीय क्रमांक मिळवले. त्यांना ११ हजार, ७ हजार व ५ हजारांची बक्षिसे दिली.
यावेळी दादासाहेब भादुले, शिवाजी भोरे, बाबासाहेब चौगुले, जमील अत्तार, दादा पुजारी, अजित तेरदाळे, फिरोज अफराज, भरत जंगटे, रमेश मालगावे, भीमा चौगुले, महिपती खोत, पिंटू बेविनकट्टी, ऋतुराज पाटील, शेसू ऐदमाळे, विष्णू तोडकर, निखिल चिपरे यांच्यासह शर्यती शौकीन उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta