बंदोबस्त कडक : आरटीपीसीआरची मागणी
कोगनोळी (वार्ता) : येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चार वर असणार्या कोगनोळी सीमा तपासणी नाक्यावर परिस्थिती जैसे थे असून या ठिकाणी महाराष्ट्रातून कर्नाटकात प्रवेश करण्यासाठी आरटीपीसीआरची मागणी करण्यात येत आहे.
सोमवार तारीख 9 रोजी दिवसभरामध्ये 51 चारचाकी वाहनातून सुमारे 200 प्रवाशांनी आपला रिपोर्ट दाखवून कर्नाटकात प्रवेश घेतला.
सीमा तपासणी नाक्यावर पोलीस बंदोबस्त कडक ठेवण्यात आला आहे. महाराष्ट्र व इतर राज्यातून येणार्या चारचाकी वाहनधारकांची कसून चौकशी करण्यात येत आहे.
सीमा तपासणी नाक्यावर आरोग्य सेविका सुमन पुजारी, जयशिला डी, आशा कार्यकर्त्या रंजना खोत, अश्विनी जाधव, शिक्षक एस. पी. जगदाळे, व्ही. के. कांबळे, बी. ए. ढोणे यांच्यासह पोलिस, होमगार्ड काम करत आहेत.
निपाणी मंडल पोलीस निरीक्षक संगमेश शिवयोगी यांच्या मार्गदर्शनाखाली निपाणी ग्रामीण पोलीस स्टेशनचे पीएसआय अनिल कुंभार एएसआय एस. ए. टोलगी, विजय पाटील, एएसआय नरेगल यांच्यासह अन्य पोलीस होमगार्ड या ठिकाणी तैनात करण्यात आले आहेत.
![](https://belgaumvarta.com/wp-content/uploads/2021/08/kognoli-646x330.jpg)