खानापूर (वार्ता) : पंतप्रधानांना पत्र पाठविणे हा एक लढ्याचा भाग झाला मात्र पत्र पाठवून आपली जबाबदारी संपणार नाही तर सीमाप्रश्नाच्या सोडवणुकीसाठी सर्वांची जबाबदारी वाढलेली असून युवकांनी सीमालढा आपल्या खांद्यावर घ्यावा आणि प्रश्न सुटे तोपर्यंत विविध मार्गाने लढण्याची जिद्द बाळगावी, असे प्रतिपादन मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष दीपक दळवी यांनी केले.
खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण युवा समितीतर्फे सोमवारी क्रांती दिनाचे औचित्य साधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सीमाप्रश्नी हस्तक्षेप करावा आणि मराठी भाषिकांना न्याय द्यावा अशी मागणी करीत हजारो पत्रे पाठविण्यात आली. निडगल येथे हुतात्मा नागाप्पा होसूरकर यांच्या पत्नी तुळसा होसुरकर यांच्या उपस्थितीत पत्र पाठविण्याच्या मोहिमेचा शुभारंभ करण्यात आल्यानंतर कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करतेवेळी दळवी यांनी सीमालढ्यात खानापूरचे योगदान मोठे असून सीमाभागातील मराठी भाषिकानीं आपला स्वाभिमान नेहमीच कायम ठेवीत प्रश्न सोडवण्यासाठी अनेक प्रकारचे प्रयत्न केले.
आजही विविध मार्गाने प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. मात्र अनेक अडचणी आल्या तरी मराठी भाषिक तसूभरही मागे हटणार नसून कर्नाटक सरकार कोणत्याही गोष्टी ऐकून घेत नाही. कोणत्याही प्रकारचा भूगोल नसलेल्या राज्यामध्ये अन्यायाने सीमा भागाला डांबण्यात आले. मात्र प्रश्नाची सोडून होईपर्यंत आपण लढत राहूया असे मत व्यक्त केले.
माजी आमदार मनोहर किणेकर यांनी दीडशे वर्षानंतर देशाला स्वातंत्र्य मिळाले होते मात्र सीमावासियांना आजही कर्नाटक सरकारच्या अन्याय अत्याचाराचा सामना करावा लागत असून भाषावर प्रांतरचना करतेवेळी जाणीपूर्वक मराठी भाषिकांना तत्कालीन म्हैसूरच्या राज्यात डांबण्यात आले.
ही चूक सुधारावी यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्याला काही दिवसात नक्कीच यश मिळेल असा विश्वास आहे असे मत व्यक्त केले.
खानापूर युवा समितीचे अध्यक्ष धनंजय पाटील यांनी प्रास्ताविक करताना एकाच दिवशी खानापूर तालुका, बेळगाव तालुका व इतर भागातून 50 हजारांहून अधिक पत्रे पाठविण्यात आली आहेत तसेच आणखीन चार दिवस जमेल त्या प्रमाणे पत्र पाठवण्यात येतील अशी माहिती दिली.
मध्यवर्तीचे खजिनदार प्रकाश मरगाळे आदींनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गणपती पाटील होते.
यावेळी तालुका समितीचे चिटणीस एल आय. पाटील, युवा आघाडीचे अध्यक्ष संतोष मंडलिक एपीएमसी सदस्य महेश जुवेकर, गणेश दड्डीकर, किरण हुद्दार, खानापूर महाराष्ट्र एकीकरण समितीचे चिटणीस गोपाळ देसाई, कार्याध्यक्ष मारुती परमेकर, गोपाळ पाटील, पांडुरंग सावंत, कृष्णा बिर्जे, निरंजन सरदेसाई, आर. डी. पाटील, परशराम कदम, दत्तू कुट्रे, विजय मादार, दत्ता उघाडे आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन राजू कुंभार तर आभार रणजित पाटील यांनी मानले.
Check Also
महांतेश कवठगीमठ यांना नागनूर रुद्राक्षी मठाचा ‘सेवारत्न पुरस्कार’
Spread the love बेळगाव : कर्नाटक विधान परिषदेचे माजी सदस्य आणि केएलई संस्थेचे संचालक महांतेश …