Saturday , July 27 2024
Breaking News

विविध मागण्यांसाठी कम्युनिस्टांची निदर्शने

Spread the love

बेळगाव : वाढती महागाई, भाषिक अल्पसंख्यांक नागरिकांचे हक्क आणि योग्यरितीने कोविड व्हॅक्सिनेशन व्हावे या मागण्यांसाठी बेळगाव शहरात कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यकर्त्यांनी निदर्शने केली. बेळगावच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करून निवेदन सादर करण्यात आले असून लवकरात लवकर सर्वसामान्य गोरगरीब नागरिकांचे प्रश्न सोडवण्यात यावेत, अशी मागणी करण्यात आली आहे.
निवेदनामध्ये वाढत्या इंधन दरासंदर्भातील मुद्द्यावर प्रकर्षाने भाष्य करण्यात आले आहे. इंधन दर वाढत आहे. त्यामुळे सर्वसामान्य माणसाला वाहने चालवणे अवघड होऊन बसले आहे. त्यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करून इंधन दर तातडीने कमी करण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
कर्नाटक महाराष्ट्र सीमाभागात शेतकर्‍यांवर जाचक कायदे आणि नियम त्रासदायक ठरत असून शेतकर्‍यांना त्रासदायक ठरणारे कायदे रद्द करण्यात यावेत, अशी मागणी करण्यात आली आहे.
भाषिक अल्पसंख्यांकांना त्यांचे हक्क मिळत नाहीत, त्यामुळे भाषिक अल्पसंख्यांकांना सुरक्षितपणे जगता यावे या दृष्टीने हक्क मिळवून द्यावेत आणि कोरोना लसीकरणाचे नियम नियोजन योग्य पद्धतीने करावे अशी मागणी करण्यात आली आहे.
कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा विभागाचे कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

मुसळधार पावसामुळे कडोली येथे घर कोसळले!

Spread the love  कडोली : बेळगाव तालुक्यातील कडोली गावात बुधवारी रात्री मुसळधार पावसामुळे जुने घर …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *