जुबेर बागवान; प्रेरणा दिनानिमित्त गुणवंतांचा सत्कार
निपाणी (वार्ता) : शिक्षणाबरोबरच जीवन चांगल्या पद्धतीने जगण्याचे शिक्षण विद्यार्थ्यांनी घ्यावे. शिक्षणाने समाजाची सुधारणा होते.पालकांनी अनावश्यक अपेक्षांचे ओझे विद्यार्थ्यांवर न लादता पाल्याची कुवत ओळखून त्याला शिक्षण द्यावे. स्वतः जगत असताना इतरांनाही मदत करण्याचे आवाहन येथील सामाजिक कार्यकर्ते माजी सभापती जुबेर बागवान यांनी केले. अर्जुनी येथील सुशीला मगदूम ग्राम वाचनालयात वाचन प्रेरणा दिनानिमित्त गुणवंतांचा सत्कार समारंभ झाला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून बागवान बोलत होते. अध्यक्षस्थानी सरपंच बापूसो यादव होते.
प्रारंभी वाचनालयाचे सचिव राहुल देसाई यांनी स्वागत तरअध्यक्ष रमेश देसाई यांनी प्रास्ताविक केले.
जुबेर बागवान यांच्या सामाजिक कार्याबद्दल वाचनालयातर्फे सत्कार झाला. त्यानंतर दहावी परीक्षेत यश मिळवलेल्या प्रणव मिसाळ, समृद्धी मिसाळ, सुयश तुपारे, शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये यश संपादन केलेल्या समर्थ चौगुले, शिष्यवृत्ती मार्गदर्शिका अर्चना गोरुले, महाराष्ट्र शासनाचा आदर्श ग्रामसेवक पुरस्कार मिळालेले अर्जुनीचे ग्रामसेवक विजय गावडे यांचा सत्कार झाला.
कार्यक्रमास उपसरपंच सुदाम देसाई, राजाराम पेडणेकर, के. एम. पेडणेकर, नारायण मिसाळ, बाबासाहेब देसाई, मानसिंग देसाई, संभाजी मोरे, विजय देसाई, अमराज देसाई यांच्यासह पालक व विद्यार्थी उपस्थित होते. ग्रंथपाल जोतीराम मिसाळ यांनी आभार मानले.