
निपाणी (वार्ता) : सर्व धर्मियांच्या ऐक्याचे प्रतिक हजरत दस्तगीर साहेब यांच्या ऊरूसाच्या तिसऱ्या दिवशी शनिवारी (ता.२८) पहाटे दर्गाहचे संस्थापक श्री संत बाबा महाराज चव्हाण यांच्या चव्हाण वारसातर्फे मानाचे निशाण व गलेफ संग्रामसिंह देसाई सरकार, रणजितसिंह देसाई सरकार, पृथ्वीराज चव्हाण, नवलिहालकर सरकार, दादाराजे देसाई-निपाणकर सरकार यांच्या हस्ते लवाजमा मानाचे फकीर व मानकरी यांच्या उपस्थितीत अर्पण करण्याचा विधी पार पडला.
उरूसानिमित चव्हाण वारस यांच्या हस्ते भर उरूसादिवशी मानाच्या चव्हाणवाडा समाधी स्थळहून भंडार खान्याचा नेवेद्य घेऊन चव्हाण वारस
रणजित देसाई सरकार, संग्राम देसाई सरकार, पृथ्वीराज चव्हाण व मानकरी लव्या जम्यासहित दर्गा मंडप मध्ये जाऊन गादिस नेवेद्य दाखवून मानाच्या फकीरांना नेवेद्य देण्यात आला.
यावेळी विशेष प्रार्थना करीत निपाणी परिसरात सुरू असलेली ही संत परंपरा निरंतरपणे सुरू रहावी. संतांच्या या भुमीचा सर्वांना लाभ व्हावा. भागात सुख, समृध्दी व एकोपा आणखीन वृध्दिंगत व्हावा,अशी प्रार्थना करण्यात आली.
त्यानंतर मुळगादी चव्हाण वाडा येथे चव्हाण वारस पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते खारीक, उदी वाटपाचा कार्यक्रम झाला. यावेळी उरुस कमिटी अध्यक्ष नगरसेवक बाळासाहेब देसाई- सरकार, सरिता देसाई, श्रीमंत दादाराजे निपाणकर- सरकार, संताजीराव घोरपडे -सरकार, सागर हरेल, बंडा गांथडे, शकील मुजावर व मानकरी उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta