Share
कोगनोळी : येथील हालसिद्धनाथ नगर जवळ असणाऱ्या स्मशानभूमीची अज्ञात व्यक्तीकडून मोडतोड करण्यात आल्याने नागरिकांतून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. संबंधित अज्ञात व्यक्तीला पोलिसांनी पकडून कारवाई करावी अशी मागणी येथील ग्रामस्थातून होत आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, हालसिद्धनाथ नगरकडे जाणाऱ्या मार्गावर असणाऱ्या स्मशानभूमीत येथील दानशूर व्यक्तींनी अंतिम दहन देण्यासाठी आलेल्या लोकांना बसण्यासाठी म्हणून सिमेंट बाकडी व कट्टे तयार करून घेतले होते. अज्ञात व्यक्तीकडून सिमेंट कट्टे फोडून त्यावरील फरशीची मोडतोड केली आहे. तर बसण्यासाठी असलेल्या सिमेंटची बाकडी जवळच असणाऱ्या गटारीत फेकून दिले आहेत. यामुळे मोठ्या प्रमाणात मोडतोड झाली आहे. अज्ञात व्यक्तीकडून अशी घटना घडली असून याबाबतची चौकशी ग्रामपंचायतीकडून करण्यात येत आहे. संबंधित अज्ञात व्यक्तीला पोलिसांनी तपास करून त्याच्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी येथील ग्रामस्थांनी केली आहे.

——————————————————————-
स्मशानभूमी येथे ग्रामपंचायत व ग्रामस्थ यांच्या मदतीने स्वच्छता व नागरिकांना बसण्यासाठी सोय करण्यात आली होती. याची मोडतोड झाल्याने नागरिकांना बसण्याची अडचण निर्माण झाली आहे. अज्ञात व्यक्तीला पोलिसांनी पकडून कारवाई करावी. तर ग्रामपंचायतीने नागरिकांना बसण्याची सोय करावी
श्री. पोपट पसारे, सामाजिक कार्यकर्ते (कोगनोळी)

Post Views:
965
Belgaum Varta Belgaum Varta