सहकारत्न उत्तम पाटील; कुन्नूरमधील गड किल्ल्यांना भेट
निपाणी (वार्ता) : छत्रपती शिवाजी महाराजांनी अनेक गड किल्ले सर करून रयतेचे राज्य निर्माण केले. त्यांचा जाज्वल इतिहास गड किल्ल्यांच्या माध्यमातून कुन्नुर गावाने जोपासला आहे. दरवर्षी विविध गडकिल्ले तयार करून शिवाजी महाराजांचे कार्य आणी प्रेरणा सर्वांना मिळत आहे. लोकांनी त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून जीवनात वाटचाल करावे, असे आवाहन बोरगाव येथील सहकाररत्न उत्तम पाटील यांनी केले. कुन्नूर येथील किल्ला महोत्सव २०२३ ला भेट देऊन पाहणी केली. त्यानंतर ते विविध मंडळातर्फे आयोजित सत्कार समारंभात बोलत होते.
यावेळी सहकाररत्न उत्तम पाटील व पृथ्वीराज अभिनंदन पाटील यांनी कुन्नूर गावातील २४ किल्ल्याना भेट दिली. युवकांनी एकापेक्षा एक सुरस असे गड किल्ले तयार केल्याचे पाहून सर्वच युवकांना प्रोत्साहित केले. यावेळी उत्तम पाटील युवा शक्तीकडून किल्ला मंडळ कार्यकर्त्यांचा सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी ममदापूर येथील निरंजन पाटील-सरकार, ग्राम पंचायत सदस्य चेतन चेंडके, शिवाजी निकम, मानाजी चेंडके, संतोष कोळी, विजय हेगडे, रवी मगदूम, विलास पाटील, माणिक कांबळे, राजू कोळी, चेतन मगदूम, महेंद्र जाधव, सर्जेराव पाटील, दिग्विजय पाटील, नासिर मुल्ला, आप्पासो मगदूम, राजू करडे, विलास नरुके, रामा करडे, मीनाक्षी तावदारे, इतर मान्यवर व उत्तम आण्णा प्रेमी उपस्थित होते.