
निपाणी (वार्ता) : कॅनरा बँकेच्या निपाणी शाखेचे अशोकनगर येथील नव्या इमारतीमध्ये स्थलांतर करण्यात आले. त्याचे उद्घाटन येथील हालसिद्धनाथ सहकारी साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष चंद्रकांत कोठीवाले यांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने झाले.
प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन झाले. निपाणी येथील व्यवस्थापक श्रीकांत यांनी स्वागत केले. चंद्रकांत कोठीवाले यांनी, चांगली सेवा दिल्यास ग्राहकांची संख्या वाढणार आहे. त्यासाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी प्रयत्न करण्याचे आवाहन केले. बोरय्या यांनी, संस्थेकडे २२४ कोटी रुपयांच्या ठेवी आहेत. ग्राहकांना उत्कृष्ट सेवा देण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे सांगितले. यावेळी पप्पू पाटील, सुनील पाटील-आडीकर यांनी मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमास चिकोडी विभागीय कार्यालयातील अधिकारी अनिल पाटील, निपाणी शाखा मुख्य व्यवस्थापक विनायक पाटील, संतोष रवळूकेदारी, राजेश पाटील, दीपक श्रीखंडे, रजनीकांत पट्टणशेट्टी यांच्यासह अधिकारी आणि ग्राहक उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta