सागर माने ; ‘देवचंद’ मध्ये छात्रसेना दिन
निपाणी (वार्ता) : छात्रसेना तरुणांची जगातील सर्वात मोठी संघटना आहे. राष्ट्र बांधणीमध्ये छात्र सेनेचे मोठे योगदान आहे. छात्र सेनेमार्फत राष्ट्रीय एकात्मता, जाज्वल्य देशप्रेम, सामाजिक बांधिलकी, पर्यावरण रक्षण इत्यादी सामाजिक जाणीवा प्रगल्भ होतात, असे मत छात्र सैनिक सागर माने यांनी व्यक्त केले. अर्जुननगर (ता.कागल) येथील देवचंद महाविद्यालय व मोहनलाल दोशी विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने छात्रसेना दिन साजरा करण्यात आला. त्यावेळी सागर माने बोलत होते.
माने म्हणाले, शारीरिक तंदुरुस्ती, व्यक्तिमत्त्व विकास, नेतृत्वगुण विकास, साहसीक खेळ, संवाद कौशल्य अशा वैयक्तीक गुणांचा विकास करण्यासाठी जाणीवपूर्वक व शिस्तबद्ध प्रयत्न करते. यामुळेच भूकंप, महापूर, ट्राफिक कंट्रोल, करोना या कालावधीत छात्रसैनिक मदतनीस म्हणून सतत अग्रेसर आहेत. छात्रसेनेच्या प्रशिक्षणामुळे भारतीय तरुणाई शिस्तप्रिय, जबाबदार, परोपकारी प्रवृती, व आत्मविश्वासपूर्ण आयुष्य जगण्यास सक्षम बनत असल्याचे त्यांनी सांगितले.
कुंभोज येथील रयत गुरूकल पब्लीक स्कूल व जुनियर काॅलेजचे मुख्याध्यापक व माजी छात्रसैनीक सागर माने यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. त्यानंतर छात्रसेनेमार्फत मानवंदना देण्यात आली.
प्राचार्या डॉ. जी. डी. इंगळे मॅडम यांनी शैक्षणिक विकासाबरोबरच छात्रसेनेमार्फत मिळणाऱ्या प्रशिक्षणाचा पुरेपूर उपयोग करून घेऊन आपला विकास साधून, आपल्या, देशाच्या व महा विद्यालयाच्या नाव लौकिकात भर घालावी. महाविद्यालयातील छात्रसेना विभाग कृतिशील व उपक्रमशील आहे असे सांगून विभागाचे कौतुक केले.
सार्जंट वैष्णवी चौगुले, जुनियर अंडर ऑफिसर आकांक्षा आरडे, कॅडेट प्रतीक इंदलकर, कॅडेट सरिता कोळी यांनी छात्रसेना दिनानिमित्त मनोगत व्यक्त केले. सागर माने यांचा प्राचार्या डॉ. जी. डी. इंगळे यांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी प्रभारी मुख्याध्यापिका एस. एम. गोडबोले उपस्थित होत्या.
यावेळी प्रथम छात्रसेना विभाग प्रमुख मेजर डॉ. अशोक डोनर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. थर्ड ऑफिसर सागर मगदूम यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. कॅडेट तनुजा पाटील व कॅडेट आदिती घस्ते यांनी सूत्रसंचालन केले.
थर्ड ऑफिसर शिवानंद चौगुले यानी आभार मानले.
उपक्रम यशस्वी करण्यासाठी अंडर ऑफिसर ओंकार खोत, जुनियर अंडर ऑफिसर प्रसाद मगदूम, सार्जंट वैष्णवी चौगुले, कार्पोरल मयुरी चौगुले यानी परीश्रम घेतले तर ५६ महाराष्ट्र बटालियन एन. सी.सी. कोल्हापूरचे कमांडिंग ऑफिसर कर्नल पुनीत गोगीआ, सुभेदार मेजर रवळू बोकडे, ३ महाराष्ट्र एअर स्क्वॅड्रन एन.सी.सी.पुणे चे कमांडिंग ऑफिसर ग्रुप कॅप्टन अभिजीत खेडकर, संस्थेचे अध्यक्ष आशिषभाई शाह, उपाध्यक्षा डाॅ.तृप्तीभाभी शाह, खजिनदार सुबोधभाई शाह यांचे मार्गदर्शन लाभले.