निपाणी (वार्ता) : शहर आणि परिसरात गुरुवारी (ता.३०) जयंती उपक्रमांनी साजरी करण्यात आली. यावेळी येथील नगरपालिका, तहसीलदार कार्यालय आणि निपाणी आगारात कनकदास जयंतीनिमित्त विविध कार्यक्रम झाले. येथील आगारात आगार प्रमुख संगाप्पा यांच्या प्रमुख उपस्थिती कनकदास यांच्या प्रतिमेचे पूजन झाले. एस. यु. चौडकी यांनी कनकदास यांच्या सामाजिक कार्याचा आढावा घेतला. कार्यक्रमास एम. एच. पाटील, एम. एम. भागाई, एस. एस. जोगीन, एस. एम. पुजारी, बीराप्पा हंजगी, एस. बी. हिप्परगी, सी.सी. बेळेभावी, एम. जी. बडीगर, पोलीस उपनिरीक्षक डी. बी. कोतवाल, पी.एन. नेगीनहाळ यांच्यासह निपाणी आगारातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta