नागरिकांची समस्या सोडवण्याची मागणी : आसन व्यवस्थेअभावी पक्षकार पायरीवर
निपाणी (वार्ता) : शहरातील न्यायालय इमारत ही भव्य व दिव्य असुन नगरीच्या सौदर्यात व वैभवात भर घालणारी आहे. पण या न्यायालयात असणारी स्वच्छतागृहे न्यायालयात विविध कामासाठी येणारे पक्षकार योग्य प्रकारे न वापरल्याने तेथील अस्वच्छता पाहण्यासारखी झाली आहे. त्यामुळे तेथील स्वच्छता करणे आवश्यक आहे.
अनेक पक्षकार गुटखा, मावा, पान, तंबाखू चघळत असून पिचकारी मारून रंग कामच केले आहे. त्यामुळे स्वछतागृह असूनही तेथील अस्वच्छता पाहूनच कोण आत जात नाही. परिणामी दुर्गंधी पसरली आहे. शिवाय नाईलाजास्तव कोर्टाची पायरी चढावी लागलेले वयोवृद्ध नागरिक, स्त्री, पुरूषांची गैरसोय होत आहे. याशिवाय न्यायालयात न्याय मागण्यासाठी येणारे वादी, प्रतिवादी त्यातील प्रामुख्याने वृध्द, अपंग आजारी व्यक्तींना बसणेसाठी आसन व्यवस्था नाही. त्यामुळे जिना हीच असन व्यवस्था म्हणून नागरीक वापर करीत आहेत. निपाणी हे तालुक्याचे केंद्र आहे आहे. तालुक्याच्या ठिकाणच्या न्यायालयात नागरीकांना स्वच्छतागृह, पिण्याच्या पाण्याची सोय, बसण्यासाठी आसन व्यवस्था करून नागरिक, वृद्ध, आजारी व्यक्तींची होणारी हेळसांड थांबविण्यासाठी न्यायालय प्रशासनाने लक्ष द्यावे, अशी मागणी जनतेतून होत आहे. याबाबत निपाणी बार असोसिएशनने दखल घेऊन नागरिकांची होणारी गैरसोय थांबविण्याची मागणी होत आहे.
—————————————————————-
‘निपाणी हे तालुक्याचे न्यायालय असून तेथे अनेक गैरसोयी आहेत. त्यामुळे पक्षकारासह वकिलांना अनेक समस्या निर्माण झाले आहेत. या समस्या दूर करण्यासाठी बार असोसिएशनने पुढाकार घेण्याची गरज आहे.’
-राजन चिक्कोडे, माजी सभापती, निपाणी
Belgaum Varta Belgaum Varta