डॉ. चंद्रकांत कुरबेट्टी : ‘महात्मा बसवेश्वर’तर्फे रक्तदान शिबिर
निपाणी (वार्ता) : अलीकडच्या काळात विविध आजाराचे प्रमाण वाढत चालले आहे. शिवाय अपघातांची संख्याही वाढली आहे. अशावेळी रुग्णांना रक्त अपुरे पडत आहे. त्यामुळे नागरिकांनी रक्तदानासाठी पुढे यावे, असे आवाहन महात्मा बसवेश्वर संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. चंद्रकांत कुरबेट्टी यांनी केले. येथील महात्मा बसवेश्वर संस्थेतर्फे आयोजित रक्तदान शिबिरात ते बोलत होते.
प्रारंभी डॉ. चंद्रकांत कुरबेट्टी, रोटरी क्लबचे अध्यक्ष प्रवीण उर्फ विरु तारळे, सेक्रेटरी राजेश तिळवे व संचालकांच्या हस्ते दीप प्रज्वलन झाले. यावेळी आयोजित रक्तदान शिबिरात १६ रक्तदात्यांनी रक्तदान केले.
रोटरी क्लब अध्यक्ष वीरु तारळे यांनी, मानवी रक्ताशिवाय पर्याय नाही. त्यामुळे रुग्णांना रक्त देण्यासाठी युवकांचा पुढाकार आवश्यक आहे. रोटरी क्लबच्या ब्लड बँकेतर्फे रुग्णांना रक्तपुरवठा केला जात आहे. रक्तदानाचे अनेक फायदे असून नागरिकांनी जीवनात एकदा तरी रक्तदान करण्याचे आवाहन केले.
यावेळी उपाध्यक्ष सरेश शेट्टी, संचालक डॉ. एस. आर. पाटील, किशोर बाली, प्रताप पट्टणशेट्टी, श्रीकांत परमणे, महेश बागेवाडी, अशोक लिगाडे, सदानंद दुमाले, प्रताप मेत्राणी, दिनेश पाटील, पुष्पा कुरबेट्टी, विजया शेट्टी, सुवर्णा पट्टणशेट्टी, सदाशिव धनगर, सीईओ शशीकांत आदन्नावर, महेश शेट्टी, विद्या कमते, किशोर फुटाणे, दिलीप पठाडे, डॉ. पवन रुतन्नावर, श्रीकांत कासुटे, यांच्यासह सभासद, कर्मचारी उपस्थित होते.