निपाणी (वार्ता) : येथील मध्यवर्ती छत्रपती शिवाजी तरुण मंडळ,शिवतीर्थ, छत्रपती शिवाजी महाराज चौकात दीपोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. मान्यवरांच्या उपस्थितीत बोरगाव येथील सहकाररत्न उत्तम पाटील यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून दीपोत्सवाचे उद्घाटन झाले. त्यानंतर शिवाजी चौकातील नागरिकातर्फे परिसरात दिवे लावण्यात आले. उत्तम पाटील यांना कर्नाटक राज्य शासनाकडून सहकाररत्न पुरस्कार मिळाल्याबद्दल मंडळातर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब जासूद, उपाध्यक्ष संजय माने, सेक्रेटरी ओंकार शिंदे, श्रीमंत विजयराजे देसाई सरकार, नगरसेवक रवींद्र शिंदे, माजी सभापती नितीन साळुंखे, विनायक वडे, गोपाळ नाईक, चंद्रकांत तारळे, पांडुरंग भोई, सुनील शेलार, सचिन पोवार, विशाल घोडके, चेतन चव्हाण, सुशांत बुडके, अतुल शिंदे, संतोष कांबळे यांच्यासह मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.