प्राचार्या डॉ. जी. डी. इंगळे; विशेष श्रमसंस्कार शिबिराचे उद्घाटन
निपाणी (वार्ता) : राष्ट्रीय सेवा योजनेचेच्या ( एनएसएस) माध्यमातून विद्यार्थ्यांमधील वक्तृत्व, गटनेतृत्व, स्वयंशिस्त, श्रमदान, सांस्कृतिक गुण विकासित होतात. विशेष श्रमसंस्कार शिबीरातून श्रमाचे महत्त्व स्वयंसेवकांना समजल्याने विविध सामाजिक मूल्यांची रूजवणूक होते. राष्ट्र उभारणीसाठी विद्यार्थी जीवनात अशी शिबीरे महत्वपूर्ण आहेत, असे मत प्राचार्या डॉ. जी. डी. इंगळे यांनी व्यक्त केले.
अर्जुननगर (ता. कागल येथील देवचंद महाविद्यालय (कनिष्ठ) राष्ट्रीय सेवा योजना +२ स्तर विभागातर्फे अर्जुनी येथे १५ ते २१ डिसेंबर अखेर विशेष श्रमसंस्कार शिबीर होत आहे. त्याचे उद्घाटन करून प्राचार्या इंगळे बोलत होत्या.
कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. आर. यु. घटेकरी यांनी स्वागत केले. उपप्राचार्य ए. डी. पोवार, पर्यवेक्षिका प्रा. एस. पी. जाधव, पर्यवेक्षक प्रा. डॉ. ए. एस. डोनर, शिक्षक प्रतिनिधी प्रा. डॉ. भरत पाटील, सरपंच बापूसो यादव, उपसरपंच सुदाम देसाई, माजी सरपंच वर्षा सुतार, तंत्रस्नेही नामदेव चौगले, बाजीराव चौगले व मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले.
यावेळी राष्ट्रीय योजना कमिटी सदस्य प्रा. ए. ए. कुराडे, तानाजी लोहार यांच्यासह स्वयंसेवक, ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते. प्रा. व्ही. पी. पाटील यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. बी. एस. कुंभार यांनी आभार मानले.
Belgaum Varta Belgaum Varta