संमेलनाध्यक्ष डॉ. सुभाष आठल्ये : कुर्लीत विज्ञान साहित्य संमेलन
निपाणी (वार्ता) : नव्या तंत्रज्ञानामुळे मानवी जीवन भौतिकरित्या सुखी बनत असले तरी पर्यावरण प्रदूषणात वाढ होत चालली आहे. याशिवाय ग्लोबल वार्मिंग मुळे अनेक नद्या बंद पडण्याची भीती आहे. त्यामुळे पालकांनी आताच जागृत राहून मुलांच्या भवितव्यासाठी पर्यावरण संरक्षण करणे गरजेचे आहे. अन्यथा ग्लोबल वार्मिंगमुळे मानवी जीवन संपुष्टात येईल, असे मत समेलनाध्यक्ष व कोल्हापूर येथील ज्येष्ठ पर्यावरण तज्ञ डॉ. सुभाष आठल्ये यांनी व्यक्त केले. कुरली येथील एचजेसीसी फाउंडेशन पुरस्कृत ग्रामीण विज्ञान साहित्य संमेलनात ते अध्यक्षानावरून बोलत होते.
डॉ. आठल्ये म्हणाले, मानवाच्या चुकीमुळेच पर्यावरणाचे प्रदूषण वाढत चालले आहे. सन २०४० पर्यंत समुद्राची पातळी १४ फुटाने वाढून अनेक भाग पाण्यात बुडतील. त्यामुळे नव्या पिढीला जगण्यासाठी आता पालका समवेत भांडावे लागेल. विद्यार्थी व युवकांनी आताच जागरूक होऊन त्या विरोधात लढा उभारला पाहिजे. नवनवीन तंत्रज्ञानामुळे रोजगार कमी पडत आहे. भविष्यात कामगार शिल्लक राहणार नाहीत. सर्व कामे यंत्राद्वारे केली जातील. याशिवाय अलीकडच्या काळात अपघातात मृत्यू पावलांची संख्या वाढत चालली आहे. ते टाळण्यासाठी प्रत्येकाने वाहतुकीचे नियम पाळले पाहिजेत. रस्त्यांच्या कडेला झाडे लावण्यापेक्षा सपाट रिकांम्या जागावर झाडे लावल्यास रस्त्याकडे ला अपघात होऊन मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या कमी होणार आहे.
प्रारंभी व्यासपीठावरील मान्यवरांच्या हस्ते कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन, प्रज्वलन आणि संमेलनाच्या व्यासपीठाचे अनावरण झाले.
सूर्याजी पोटले यांनी स्वागत तर एस. एस. चौगुले यांनी प्रस्ताव केले. यावेळी अरुण निकाडे, कुमार माळी, संजय शिंत्रे, बी. एस. पाटील, दादासाहेब लंबे, सिताराम चौगुले, दादासाहेब पाटील, एस. एम. नदाफ, डी एस, शेवाळे यांच्यासह कुरली परिसरातील नागरिक व विद्यार्थी उपस्थित होते.