निपाणी (वार्ता) : दुचाकींच्या अपघातामध्ये हेल्मेट आभावी अनेक दुचाकी स्वारांचा मृत्यू झाला आहे. अशा घटना टाळण्यासाठी येथील बसवेश्वर चौक पोलीस ठाणेतर्फे येथील कन्नड मुलांची शाळा क्रमांक १ मध्ये विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती करण्यात आली.
अध्यक्षस्थानी एसडीएमसी अध्यक्ष सत्याप्पा चिंगळे होते.
प्रारंभी मुख्याध्यापक एम. डी. मुल्ला यांनी स्वागत केले. उपनिरीक्षक डी. बी. कोतवाल यांनी, वाहतुकीचे नियम, हेल्मेट सक्ती व इतर अपघाताबाबत ची माहिती दिली. सहाय्यक निरीक्षक आर. जी. कुंभार यांनी सिग्नलचे नियम, रस्ता ओलांडताना पादचाऱ्यांनी घ्यावयाची काळजी याबाबत मार्गदर्शन केले. याशिवाय वाढत्या गुन्हेगारीच्या घटनाबाबत विद्यार्थ्यांनी जागृत राहून पोलीस प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.
कार्यक्रमास एसडीएमसी अध्यक्ष सत्याप्पा चिंगळे, चंद्रशेखर कंबार, व्ही.पी.दोडमनी, एच. ए. बाणदार, आर. एस. नारायणकर, विद्या कलादगी, जी. बी. गलबी उपस्थित होते. एस. बी. शास्त्री यांनी आभार मानले.