निपाणी (वार्ता) : बंद घराचे कुलूप तोडून एक तोळ्याचे दागिने व रोख पाच हजार रुपये चोरी झाल्याची घटना मंगळवारी (ता.11) सकाळी येथील भाट गल्ली येथे उघडकीस आली. या घटनेमध्ये मीना खंडेराव शेटके यांना सुमारे 60 हजार रुपयांचा फटका बसला आहे.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी, मीना शेटके या घरी एकट्याच वास्तव्यास आहेत. त्यामुळे शिवाजीनगर येथील आपल्या मुलीकडे दोन दिवस राहण्यासाठी त्या गेल्या होत्या.
सलग दोन दिवस घर बंद असल्याचे हेरून चोरट्यांनी सोमवारी (ता.10) मध्यरात्री लोखंडे दरवाजाचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला. प्रथमता गॅस कट्यावरील सर्व भांड्यांची तपासणी करून ही काही न मिळाल्याने त्यांनी तिजोरी कटावनीने उचकटून त्यातील साहित्य विस्कटून टाकले. यावेळी त्यांना लहान मुलांचे एक तोळ्याचे दागिने हाती लागले. त्याशिवाय रोख पाच हजार रुपये घेऊन चोरट्यांनी पोबारा केला. याशिवाय गव्हाचे पीठ आणि इतर साहित्यही चोरट्याने लंपास केले आहे. या घटनेची माहिती शेळके यांना नागरिकांनी दिल्यानंतर त्यांनी घटनास्थळी भेट दिली. भाट गल्ली परिसरात नेहमी नागरिकांची वर्दळ असताना चोरीची घटना कशी घडली याबाबत चर्चा सुरू झाली आहे.
रात्री उशिरापर्यंत या घटनेची नोंद पोलिसात झाली नव्हती.
Check Also
मूलभूत सोयी सुविधांच्या मागणीसाठी नागरिकांचे आमदार जोल्ले यांना निवेदन
Spread the love निपाणी (वार्ता) : येथील रामनगर, अष्टविनायकनगर, कमलनगर परिसरात रस्ते, वीज, पाणी, गटारी …