Sunday , July 26 2026
Breaking News

चिक्कोडी प्रांताधिकारीपदी संतोष कामगौडा रुजू

Spread the love

चिक्कोडी (वार्ता) : मूळचे चिक्कोडी तालुक्यातील कब्बूर गावचे रहिवासी आणि 2014 च्या तुकडीचे केएएस अधिकारी संतोष कामगौडा यांनी चिक्कोडी प्रांताधिकारी पदाची सूत्रे स्वीकारली. कर्नाटक प्रशासकीय सेवा परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर संतोष कामगौडा यांनी आधी प्रशिक्षणार्थी म्हणून व नंतर विविध ठिकाणी अधिकारी म्हणून सेवा बजावली आहे. रायचूर येथे प्रांताधिकारी म्हणून त्यांनी आपल्या कामाचा ठसा उमटवला आहे. चिक्कोडी प्रांताधिकारी पदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला. चिक्कोडीतील भौगोलिक, सामाजिक रचनेविषयी आपल्याला माहिती असल्याने येथील जनतेचा आवाज बनून काम करेन अशी ग्वाही त्यांनी दिली. खर्‍या लाभार्थीना सरकारी पेन्शन योजनेचा लाभ व्हावा यासाठी सरकारने नवोदय ऍप सुरु केले आहे. त्याद्वारे तलाठ्यांना आपल्या परिसरातील 60 वर्षांपुढील नागरिकांची माहिती मिळते. त्यामुळे खर्‍या लाभार्थीना न्याय मिळतो. म्हणून या ऍपद्वारे काम करण्यात येईल असे कामगौडा यांनी सांगितले. चिक्कोडी शैक्षणिक जिल्ह्यात कोरोना ओमीक्रॉनचा संसर्ग रोखण्यासाठी काटेकोर पावले उचलण्यात येत आहेत. जिल्ह्यात कोरोनाच्या दुसर्‍या लाटेत अनेकांचा मृत्यू झाला. अनेक कुटुंबे उघड्यावर पडली.

About Belgaum Varta

Check Also

सदलग्यात विद्युत कंपनीच्या खाजगीकरणाविरोधात शेतकऱ्यांचा पाठिंबा

Spread the love  सदलगा : सदलगा येथे आज येथील समस्त शेतकऱ्यांनी एकत्रितपणे कर्नाटक राज्य विद्युत …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *