Wednesday , March 4 2026
Breaking News

न्याय हक्कासाठी शेतकऱ्यांची एकजूट महत्वाची

Spread the love

 

राजू पोवार; शिरहट्टी येथे शाखेचे उद्घाटन

निपाणी (वार्ता) : उस, सोयाबीन पिकाला हमीभाव मिळण्यासह इतर पिकांना खर्चाच्या तुलनेत भाव मिळत नाही. परिणामी शेतकरी कर्जबाजारी होऊन आत्महत्याकडे वळत आहेत. त्यामुळे यापुढील काळात पिके घेणाऱ्या शेतकऱ्यांना हमीभाव मिळावा. यंदाच्या उसाला प्रतिटन ५५०० रुपये दर मिळावा, या मागणीसाठी रयत संघटनेतर्फे हिवाळी अधिवेशनात विधानसभेवर मोर्चा काढून घेराव घातला. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी बैठकीसाठी पाचारण केले आहे. या पुढील काळात न्याय हक्कासाठी शेतकऱ्यांची एकजूट महत्वाची आहे, असे मत कर्नाटक राज्य रयत संघटनेचे कार्याध्यक्ष राजीव पोवार यांनी व्यक्त केले.
हुक्केरी तालुक्यातील शिरहट्टी (बी) येथे रयत संघटनेच्या शाखेचे उद्घाटन करून ते बोलत होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून पृथ्वी कत्ती उपस्थित होते.
पोवार म्हणाले, सोयाबीन, ऊसाला योग्य दर मिळावा, यासाठी रयत संघटनेने आतापर्यंत मंत्री महोदयांसह जिल्हाधिकारी तलाठी तहसीलदार यांना निवेदन दिले आहे. पण याबाबत कोणताच निर्णय झालेला नाही. कर्नाटकासह सीमाभागातील महाराष्ट्रातील साखर कारखान्यांनी तीन हजार रुपयांपर्यंत जाहीर करून ऊसतोड सुरू केली आहे. हा दर रयत संघटनेसह शेतकऱ्यांना अमान्य आहे. गत हंगामातील ५०० रुपये आणि यंदाच्या हंगामात साखर कारखाने आणि सरकारने मिळून ५ हजार ५०० रुपये द्यावा. शिवाय कर्नाटक सीमा भागातील महाराष्ट्रातील कारखान्यांनी प्रति टन ३२०० ते ३४०० रुपये दर देत आहेत. त्यामानाने कर्नाटकातील कारखान्यांनीही दर द्यावा. बेळगाव जिल्हा दुष्काळी घोषित करूनही आजपर्यंत एकाही शेतकऱ्याला भरपाई मिळालेली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचे सर्व कर्ज आणि व्याज माफ करून उतारा कोरा करावा, अशी रयत संघटनेसह शेतकऱ्यांची मागणी आहे. हा दर मिळावा यासाठी रस्त्यावरची लढाई करण्यास सर्वांनी सज्ज आवाहन केले.
यावेळी संघटनेचे राज्य अध्यक्ष चुन्नाप्पा पुजारी, शशिकांत पडसलगी, मृत्युंजय स्वामी, निपाणी तालुका अध्यक्ष बंटी पाटील, बाबासाहेब पाटील, रामण्णा गओटूर, संजू हत्तरवाट, विठ्ठल होसमणी, सुरेश नायक, रामाप्पा मुत्नाळे यांच्यासह रयत संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते व शेतकरी उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

लेटेक्स कॉलनीत मूलभूत सुविधा न दिल्यास नगरपालिके समोर नागरिकांचा उपोषणाचा इशारा

Spread the love  निपाणी (वार्ता) : निपाणी येथील शहरा बाहेर असलेल्या लेटेक्स कॉलनीमध्ये बऱ्याच वर्षापासून …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *