
तयारी पूर्णत्वाकडे
निपाणी (वार्ता) : निपाणीत रविवारी (ता.२४) डॉ. आंबेडकर विचार मंचतर्फे २७ वे फुले, शाहू, आंबेडकर विचार संमेलन होत आहे. संमेलनाच्या माध्यमातून मानवी जीवनामध्ये सामाजिक व सांस्कृतिक मूल्यांच्या विचारांचा जागर होणार आहे. ज्येष्ठ विचारवंत संजय आवटे व विद्रोही व परिवर्तनवादी विचारांची कास धरणारे कवी अनंत राऊत यांच्या विचारातून समतेचा जागर होणार.आहे. बुद्ध, बसव, आंबेडकर ते विद्रोही तुकाराम दाश्य मुक्तीचा धगधगता इतिहास, मुक्त चिंतन होणार आहे.
परिचय
संजय आवटे
प्रख्यात लेखक-संपादक-वक्ते, ‘साम टीव्ही’चे मुख्य संपादक अशा विविध ठिकाणी काम केले आहे. ‘आवाज महाराष्ट्राचा’ या प्राइम टाइम शो मुळे अनेक मापदंड निर्माण केले. याशिवाय मुंबई ‘सकाळ’चे संपादक म्हणून त्यांनी काम केले आहे.
बीएससी ऍग्री पर्यंत त्यांचे शिक्षण झाले आहे. एमएमसीजेमध्ये त्यांनी सुवर्णपदक पटवले आहे. ‘गेम ऑफ थ्रोन्स- मराठी पटकथा’ हे त्यांचे सध्या गाजत असलेले पुस्तक आहे. ‘आम्ही भारताचे लोक’ हे पुस्तक आजही चर्चेत आहे. ‘बराक ओबामा-बदलत्या जगाचा सक्सेस पासवर्ड’ या पुस्तकाने खपाचे विक्रम मोडले आहेत. ‘चला प्रेम व्हायरल करू!’ हा चार पुस्तकांचा संच प्रकाशित झाली आहेत. बाप पळविणारी टोळी आलीय, अनागोंदीच्या नोंदी, शर्वरी दिक्षीतचं काय झालं, कोलाहलाचे जागतिकीकरण
या चारही पुस्तकांतून राजकीय आणि सामाजिक विषयांवर थेटपणे भाष्य केले आहे. अशा एकूण पंधरा पुस्तकांचे लेखन त्यांनी केले असून अनेक पुरस्कार लाभले आहेत. याशिवाय विविध ठिकाणच्या संमेलनात त्यांनी व्याख्याने दिली आहेत.
अनंत राऊत
अनंत राऊत हे व्यवसायाने एम टेक अभियंते आहेत.
८ वर्ष नोकरी करून पुर्णवेळ प्रबोधनाला वाहून घेतले आहेत. व्याख्याते, कवि, लेखक म्हणून त्यांना विविध पुरस्कार मिळाले आहेत.
गोवे साहित्य संमेलनाध्यक्ष, उंब्रज साहित्य संमेलनाध्यक्ष
(कवी संमेलन अध्यक्ष) ग्रामसंस्कृती साहित्य संमेलन अब्दुल्लाट, पाटण साहित्य संमेलन अशा विविध ठिकाणी त्यांनी अध्यक्षपद भूषविले आहे. ‘काव्यमय समाज प्रबोधन’, ‘मित्र वणाव्यामधे गारव्यासारखा’, ‘कविता गप्पांची हस्यमय प्रबोधनकारी मैफील’,
‘आनंदाचे शोधावे घर दुखःच्याही छाताडावर’, ‘बुद्ध ते बाबासाहेब व्हाया तुकाराम’ यासह विविध विषयावर त्यांनी व्याख्याने आणि कविता सादर केल्या आहेत.
Belgaum Varta Belgaum Varta