कोरोनाचे संकट : ऑनलाईन शिक्षणाला प्राधान्य
निपाणी (वार्ता) : राज्यात कोरोना संक्रमणामुळे नव्याने निर्बंध लागू करण्यात आले आहेत. त्यामुळे मंगळवार (ता.11) पासून मंगळवार पर्यंत (ता.18) इयत्ता पहिली ते नववी पर्यंतचे वर्ग प्रत्यक्षरीत्या बंद झाले आहेत. नव्या आदेशामुळे शाळांतील किलबिलाट पुन्हा थांबलेला आहे. शाळा बंद शिक्षण सुरू याअंतर्गत ऑनलाईन वर्गाला काही शाळाकडून प्राधान्य देण्यात येत आहे. मात्र, रिचार्ज किंमती वाढल्यामुळे ग्रामीण भागात ऑनलाईन शिक्षणास पालकांचा अल्पसा प्रतिसाद मिळत आहे.
निपाणी तालुक्यात 123 प्राथमिक आणि माध्यमिक शाळा आहेत. खासगी शाळांची संख्याही शेकडोंच्या घरात आहे. मागील दोन वर्षांपासून कोरोना संकटामुळे विद्यार्थी व पालकांसमोर मोठे आवाहन निर्माण झाले आहे. मागीलवर्षी कोरोना नियंत्रणात आल्यानंतर शैक्षणिक सत्राच्या सुरुवातीला ग्रामीण भागात शाळांना सुरुवात झाली होती. टप्प्याटप्प्याने इयत्ता पहिली ते बारावीपर्यंतचे वर्ग नियमित सुरू झाले. मात्र मागील महिन्यापासून देशभरात कोरोना संकट अधिक गडद झाले. त्याचा शैक्षणिक क्षेत्रावर पुन्हा परिणाम झाला आहे. महाराष्ट्रासह कर्नाटकातून कोरोना संकट वाढल्यामुळे कर्नाटकातील इयत्ता पहिली ते नववी पर्यंतचे प्रत्यक्ष वर्ग बंद करण्याचे आदेश धडकले आहेत. त्यामुळे शाळांतील किलबिलाट शांत झालेला आहे. काही शाळाकडून ऑनलाईन शिक्षण घेण्यासाठी विद्यार्थी व पालकांना प्रोत्साहित करण्यात येत आहे. इंटरनेट युगात अलीकडे रिचार्ज किमती वाढल्याने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसमोर ऑनलाईन वर्ग आव्हानात्मक बनत आहेत. विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या सुरक्षिततेसाठी शासनाने सुरक्षित पाऊल उचलले आहे. शैक्षणिक नुकसान होऊ नये, यासाठी शालेय स्तरावरून ऑनल प्लॅटफॉर्मवरून विद्या शिक्षण देणे सुरू आहे. ऑनलाईन शिक्षणातही आता आव्हानात्मक स्थिती निर्माण झाली आहे.
परीक्षा कशा होणार?
मार्च आणि एप्रिल महिन्यात इयत्ता दहावी, बारावीच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर झालेले आहे. कोरोना संकटामुळे परीक्षा कशा होणार, याकडे लक्ष लागले आहे.
—
’राज्यात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत त्यामुळे शिक्षण विभागाने पहिली ते नववी पर्यंत शाळा आठवडाभर बंद ठेवण्याचा आदेश दिला आहे. मात्र दहावी आणि बारावीच्या शाळा सुरूच राहणार आहेत.’
– रेवती मठद, गटशिक्षणाधिकारी, निपाणी.
Check Also
केंद्राने सीमाप्रश्नी लक्ष घालण्याची विनंती करणारा ठराव संमत
Spread the love मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याबद्दल निपाणीत आनंदोत्सव निपाणी : मराठी भाषेला …