संकेश्वर (वार्ता) : समस्यांची सोडवणूक कौशल्याने सहज करता येत असल्याचे शिक्षक तज्ञ, अभ्यासक आणि लेखक डॉ. ए. बी. कालकुंद्रीकर यांनी सांगितले.
ते संकेश्वर एसडीव्हीएस शिक्षण संस्था संचलित अन्नपूर्णा इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट रिसर्चच्या कॉफी विथ द एक्झिक्युटिव्ह समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. ते पुढे म्हणाले कौशल्याचा वापर करून अनेकजण यशस्वी झाले आहेत. संकेश्वर एम. बी. ए. कॉलेजतर्फे विद्यार्थ्यांना उत्तम शिक्षण देवून घडविण्याचे काम केले जात आहे. त्यांनी व्यवस्थापन शिक्षणाचे महत्व विद्यार्थ्यांना पटवून दिले.
अन्नपूर्णा इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट रिसर्चने, कॉफी विथ द एक्झिक्युटिव्हचे आयोजन केले आहे, ही टॉक शोची एक मालिका आहे जिथे विविध क्षेत्रातील नामवंत व्यक्तींना विशेष चर्चेसाठी आमंत्रित केले जाते.
या मालिकेअंतर्गत बेळगाव येथील प्रख्यात शिक्षणतज्ञ, अभ्यासक आणि लेखक डॉ. ए. बी. कालकुंद्रीकर यांना कार्यकारी संसाधन व्यक्ती म्हणून आमंत्रित केले होते. अखचठ च्या संचालिका डॉ. विद्या स्वामी यांनी पाहुण्यांचे स्वागत करून कॉफी विथ द एक्झिक्युटिव्ह श्री. पद्मराज आलापनावार यांनी कार्यकारिणीचा परिचय करून दिला या टॉक शोचे महत्त्व विशद केले.
यावेळी प्रा. संतोष तेर्णिमठ, डॉ. प्रकाश कुंदरगी, प्रा. अनिता बिराज, प्रा. सुनील मोहिते, सौ. सरोजा सूर्यवंशी, मिस. पूर्णिमा पाटील उपस्थित होते.
अन्नपूर्णा इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट रिसर्चच्या विद्यार्थ्यांनी कॉफी विथ द एक्झिक्युटिव्ह या टॉक शोचा लाभ घेतला. श्री. धनंजय कुलकर्णी यांनी टॉक शोचे सूत्रसंचालन केले. मिस. फरहाना हवालदार यांनी आभार मानले.
