संकेश्वर (वार्ता) : संकेश्वर-करवीर श्री शंकराचार्य पीठाकडून श्री सच्चिदानंद अभिनव विद्यानिू्ंसह भारती महास्वामीजींच्या हस्ते बीड तालुक्यातील नवगण राजुरीचे अमृत महाराज (जोशी) स्वामीजींना धर्मगुरू उपाधीने गौरविण्यात आले. औरंगाबाद जिल्ह्यातील श्रीक्षेत्र पैठण येथे हा सोहळा पार पडला. नवगण राजुरीचे अमृताश्रम स्वामीजी हे महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील ज्येष्ठ म्हणून ओळखले जातात. श्रीं धर्मजागृती, समाजप्रबोधन कार्यात सतत कार्यरत राहिले आहेत.नवगण राजुरीच्या श्रींना संकेश्वर-करवीर श्री शंकराचार्य पीठाकडून संकेश्वर श्री शंकराचार्य महास्वामीजींच्या हस्ते ’पुष्पहार, सन्मानपत्र, महावस्त्र, धर्मग्रंथ देऊन धर्मगुरू उपाधीने गौरविण्यात आले. यावेळी ज्योतीषाचार्य अतुलशास्त्री भगुरे गुरुजी, वेदमूर्ती पोहेकर गुरुजी, शिवपुरी गुरुजी, राजसाहेब महाराज गोसावी, नाथ वंशज उपस्थित होते.
