
निपाणी (वार्ता) : सामाजिक बांधिलकीच्या माध्यमातून समाज हितासाठी सामाजिक संस्था म्हणून कार्यरत असणा-या बोरगाव येथील साई मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलतर्फे आयोजित मोफत महाआरोग्य शिबिरास उत्सुकूर्त प्रतिसाद मिळाला.
बोरगाव व परिसरातील नागरिकांसाठी साई मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल यांच्या वतीने हृदयविकार, मूत्रविकार, मुतखडा, हाडाची लक्षणे , मोफत उपचार, मोफत ईसीजी व मोफत रक्तातील साखर तपासणी या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
सुमारे १२० लोकांचे हृदयविकाराचे, १५० हाडांची समस्या,१६० नेत्र तपासणी, ९० लोकांचे मूत्रविकाराचे, १०५ मधुमेह रुग्णांचे मोफत साखर तपासणी,११०लोकांचे मोफत ईसीजी काढून त्यांना अधिक उपचारासाठी माहिती देण्यात आले.
याप्रसंगी बोलताना डॉ. आरिफ मुजावर म्हणाले, बोरगाव व परिसरातील रुग्णांसाठी आपण ही सेवा देत आहोत. सर्वसामान्य गरीब रुग्णांना मोफत सुविधांचा लाभ व्हावा यासाठी आपण या शिबिराचे आयोजन केले आहे. इचलकरंजी येथील अलायन्स हॉस्पिटल व साई मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल यांच्या वतीने रुग्णांसाठी अनेक मोफत उपचार व सेवा देण्यात येत असून सर्वांनी लाभ घ्यावा असे सांगितले.
याप्रसंगी हृदयरोग तज्ञ डॉ. अमोल भोरे, अस्थिरोग तज्ञ राहुल पटेकरी, नेत्ररोगतज्ञ निलेश चौगुले, अक्षय उगारे, मधुरा महाजन, डॉ. आरिफ मुजावर उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta