केंद्रीय मंत्री नितीन गडकरी; उत्तम पाटील यांनी घेतली भेट
निपाणी (वार्ता) : शेतकरी कष्टकरी जनतेच्या प्रश्नाला वाचा फोडून त्याची सोडवणूक करणारे माजी कृषिमंत्री शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली सहकाररत्न उत्तम पाटील यांच्या सहकार्याने केंद्रीय वाहतूक दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांची नवी दिल्ली येथे भेट घेतली. यावेळी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून वेदगांगा नदीकाठ बचाव कृती समितीच्या कार्यकर्त्यांनी मांगुर फाटा येथे भराव ऐवजी पिलर बांधण्याची मागणी केली. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी भराव न घालता पिलर बांधण्याच्या सूचना महामार्ग प्राधिकरणाला केल्या आहेत. त्यामुळे या मागणीला यश आले आल्याची माहिती सहकारत्न उत्तम पाटील यांनी दिली.
गेली दोन महिन्यांपासून मांगुर फाटा भराव हटवून पिलर ब्रीज बांधण्याची मागणी सर्व स्तरातून होत होती. पावसाळा महापूर आल्यानंतर वेदगंगा नदी काठासह महाराष्ट्रातील अनेक गावातील शेती आणि मालमत्तेचे नुकसान होणार होते. त्यामुळे या ठिकाणी भराव न टाकता पिलर बांधण्याची मागणी वारंवार केली होती. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सदरचे बाब गांभीर्याने घेऊन नेते मंडळी, शेतकरी व नागरिकांच्या मागणीला सहमती दर्शवून संबंधित अधिकाऱ्यांना त्या प्रकारचे निर्देश दिले. त्यामुळे पावसाळ्यात होणारे गैरसोय टाळणार आहे.
याप्रसंगी कृती समितीचे के. डी. पाटील, चंद्रशेखर सावंत, अजित पाटील, दीपक पाटील, सुदीप वाळके, शिवाजी पाटील, अमोल पाटील, नानासाहेब पाटील, लक्ष्मीकांत पाटील, निरंजन पाटील -सरकार, राजेखान जमादार यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.