
निपाणी (वार्ता) : लातुर जिल्ह्यातील वलांडी येथील सहा वर्षाच्या बालिकेवर एका नराधम युवकांने आपल्या घरी घेऊन जाऊन त्या बालिकेवर सलग पाच दिवस अत्याचार केला. ही गोष्ट सर्वच समाजाला लज्जास्पद आहे. मागासलेल्या अनुसूचित खाटीक समाजातील या कुंटूबाला महाराष्ट्र शासनाने सर्वतोपरी मदत करावी. तसेच त्यांना सरंक्षण द्यावे, अशी मागणी आम्ही महाराष्ट्र कर्नाटक सीमाभाग हिंदू खाटीक महासंघाचे वतीने या घटनेचा निषेध करून संशयतावर कारवाई करण्याची मागणी निवेदनाद्वारे केली.
Belgaum Varta Belgaum Varta