निपाणी (वार्ता) : बेळगाव जिल्हा पंचायत, कर्नाटक शिक्षण विभाग, आणि गटशिक्षणाधिकारी कार्यालयाच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय माध्यमिक शिक्षण अभियानांतर्गत दिव्यांग विद्यार्थ्यांना मोफत साधनांचे वाटप करण्यात आले. अध्यक्षस्थानी नगरसेवक संतोष सांगावकर होते.
प्रारंभी व्यासपीठावरील मान्यवरांच्या हस्ते रोपाला पाणी घालून कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. गटशिक्षणाधिकारी महादेवी नाईक यांनी स्वागत केले. आर. ए. कागे यांनी, गटशिक्षणाधिकारी कार्यालयाच्या कार्यक्षेत्रातील ३७० दिव्यांग विद्यार्थ्यांचे तपासणी केली होती. त्यातील ६० विद्यार्थ्यांना या साधनांचे वाटप केले आहे. याशिवाय अशा विद्यार्थ्यांसाठी शासनातर्फे विविध योजना असून त्याचा लाभ घेण्याचे आवाहन केले.
माजी नगराध्यक्ष जयवंत भाटले यांनी, माजी मंत्री आमदार शशिकला जोल्ले यांनी निपाणी मतदारसंघातील दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी अनेक योजना आणल्या आहेत. त्याचा विद्यार्थ्यांना लाभ होत असून विविध प्रकारचे प्रोत्साहन धन देण्यात येत असल्याचे सांगितले. व्यासपीठावरील मान्यवरांच्या हस्ते व्हीलचेअर, वाकी स्टिक, व इतर शैक्षणिक साधनांचे वाटप करण्यात आले.
कार्यक्रमास माजी, उपनगराध्यक्षा निता बागडे, माजी सभापती राजू गुंदेशा, दत्ता जोत्रे, प्रणव मानवी, शिक्षण संयोजक महालिंगेश, रोहित मजलट्टी, शांताराम जोगळे, ए. बी. होननाईक, डी. डी. शिंदे, सुशील कांबळे, अर्चना पाटील, शांता सुनगार, एम. वाय. गोकार, सुनील शेवाळे, भास्कर स्वामी, पी. एस. पाटील, विनायक चव्हाण, पी. आर. कांबळे, एम. डी. मुल्ला, राघवेंद्र इंगळे, प्रशांत रामनकट्टी, वाय. बी. हंडी, सदाशिव वड्डर, संदीप गोसावी यांच्यासह सीआरसी, बीआरसी प्रमुख, शिक्षक, विद्यार्थी व पालक उपस्थित होते. प्रवीण कागे यांनी आभार मानले.