शनिवारी श्री विहार रथोत्सव
निपाणी (वार्ता) : स्तवनिधी येथील ब्रम्हदेवाच्या विशाळी यात्रेस शुक्रवारी प्रारंभ झाला. शनिवारी (ता.१०) दुपारी ३ वाजता रथोत्सवाने यात्रेची सांगता होणार आहे. यात्रेनिमित्त महाराष्ट्र व कर्नाटकातील लाखो भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती.
शुक्रवारी पहाटे पाच वाजता अनिल कलाजे यांच्या परत त्याखाली नांदी मंगल, मूलनायक नवखंड पार्श्वनाथ तीर्थंकर यांचा पंचामृत महा अभिषेक, श्रीक्षेत्रपाल ब्रह्मदेवास तुपाचा अभिषेक करण्यात आला. त्यानंतर बोरगाव येथील युवा उद्योजक अभिनंदन पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. सकाळी १०.३० वाजता पंचामृत अभिषेक, १२ वाजता क्षेत्रपालांना तेल आणि शेंदुराचा अभिषेक झाल्यावर राजू पंडित धीरज पंडित यांच्या प्रमुख उपस्थितीत आरती करण्यात आली. त्यानंतर महाप्रसादाचे वाटप झाले.
सायंकाळी पालखी उत्सव सोहळा पार पडला. गवाणी व तवंदी येथील भाविकातर्फे शनिवारी (ता.१०) यात्रा होणार आहे. शुक्रवारी दिवसभर दक्षिण भारत जैन सभेचे अध्यक्ष सहकारत्न रावसाहेब पाटील, सहकारत्न उत्तम पाटील, माजी आमदार कलाप्पाण्णा मग्गेन्नावर, आमदार प्रकाश आवाडे, यांच्यासह कोल्हापूर आणि बेळगाव जिल्ह्यातील भाविकांनी क्षेत्रपालाचे दर्शन घेतले. यात्रेत भाविकांना सुरळीत दर्शनासाठी कमिटी व पोलिसातर्फे विशेष सोय करण्यात आली होती.
यावेळी चेअरमन तात्यासाहेब पाटील, व्हा. चेअरमन राजगौडा खोत, सेक्रेटरी बाळासाहेब मगदूम, जॉईंट सेक्रेटरी आनंद उगारे, प्रा. विलास उपाध्ये, राजू पाटील, सुंदर पाटील, किरण पाटील, इंद्रजित पाटील, शशीकुमार गोरवाडे, राजेंद्र कंगळे, सुनील बल्लोळ, भरत पाटील, अच्युत आलगुरे, प्रदीप पाटील यांच्यासह कमिटीचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.