
सुधाकर माने; बौद्ध धम्म दीक्षा सोहळा होणार
निपाणी (वार्ता) : येथे धम्म परिषद व धम्म उपासक कपिल कांबळे यांना दुचाकी प्रदान कार्यक्रम २५ रोजी राजा शिवछत्रपती सांस्कृतिक भवनाजवळ होणार आहे. त्यानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन केल्याची माहिती धम्म परिषदेचे स्वागताध्यक्ष सुधाकर माने यांनी दिली. येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित बैठकीत ते बोलत होते.
माने म्हणाले, निपाणी शहराला अनेकवेळा डॉ. बाबासाहेब आंबेडकर, माता रमाई आंबेडकर यांचा पदस्पर्श झाला आहे. त्यामुळे निपाणीला चळवळीचे केंद्र म्हणून पाहिले जाते. येथील म्युनिसिपल हायस्कूलवर उभारण्यात आलेला क्रांतीस्तंभ सर्वांसाठी प्रेरणा देणारा ठरला आहे. शहरात सन २००७ साली धम्म परिषद झाली होती. त्यानंतर आता पुन्हा ही परिषद होत आहे.
२५ रोजी सकाळी १०.३० वाजता ध्वजारोहण व गुगवाड (सांगली) येथील चंद्रकांत सांगलीकर यांच्या हस्ते धम्म परिषदेचे उद्घाटन होणार आहे. याशिवाय ज्येष्ठांचे मार्गदर्शन, बौद्ध धम्म दीक्षा सोहळा होणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भंते एस. संबोधित थेरो हे भूषवणार आहेत. दुसरे सत्र २ ते ५ या वेळेत होणार असून कपिल कांबळे यांना दुचाकी प्रदान करण्यात येणार आहे. यावेळी या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भंते आर. आनंद थेरो हे असणार आहेत. तरी या परिषदेसाठी बौद्ध बांधवांनी उपस्थित राहण्याचे आवाहन माने यांनी केले.
बैठकीस प्रा. जे. डी. कांबळे, सुनील शेवाळे, प्रवीण सौंदलगे, मिथुन मधाळे, जयवंत कांबळे, रेखा कांबळे, भिकाजी कांबळे, पिंटू माने, प्रकाश कांबळे, गोपाळ मेस्त्री, दिलीप कांबळे, बाबासाहेब आवटे, बजरंग कांबळे उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta