Wednesday , March 4 2026
Breaking News

दूध दर कपातीचा निर्णय मागे नाही घेतल्यास आंदोलन

Spread the love

 

रयत संघटनेच्या राजू पोवार यांचा इशारा

निपाणी (वार्ता) : कर्नाटक सीमाभागासह राज्यातील मोठ्या प्रमाणात दूध कोल्हापूर येथील गोकुळ दुध संघाला दिला जातो. पण कर्नाटक आणि महाराष्ट्र असा भेदभाव करून या संघाच्या सुविधा दिल्या जात नाहीत. संघाने सर्वच दूध उत्पादकांना महाराष्ट्राप्रमाणे दर द्यावा, अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा रयत संघटनेचे कर्नाटक राज्य कार्याध्यक्ष राजू पोवार यांनी दिला. मंगळवारी (ता.१३) दुपारी येथे आयोजित संघटनेच्या बैठकीत ते बोलत होते.
राजू पोवार म्हणाले, गोकुळ दूध संघाने १ फेब्रुवारीपासून सीमा भागासह कर्नाटकातील म्हैस दुधाला ३ रुपये तर गाईच्या दुधाला साडेचार रुपये दर कमी केले आहे. त्यामुळे या भागातील दूध उत्पादकावर अन्याय होत आहे. गोकुळ दूध संघाच्या स्थापनेपासून कर्नाटक सीमा भागातील दूध मोठ्या प्रमाणात जात आहे. महाराष्ट्रातील दूध कमी असताना या भागातील दुधावरच संस्थेची प्रगती झाली आहे. असे असताना महाराष्ट्र आणि कर्नाटक असा भेदभाव करून दर कमी करणे चुकीचे आहे. कर्नाटकातील सर्व दूध संस्था नोंदणीकृत आहेत. गोकुळ संघाच्या नियम व अटीनुसार या भागातील दूध उत्पादक या संघाला दूध पाठवतात. त्यामुळे रविवार पर्यंत (ता.२५) संचालक मंडळाने दर कपातीचा घेतलेला निर्णय मागे न घेतल्यास कोगनोळी टोल नाक्याजवळ संघटनेतर्फे आंदोलन करण्याचा इशारा आला. तरी कर्नाटकातील विविध उत्पादकांनी जागृत राहून या आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन राजू पोवार यांनी केले.
बैठकीस तालुका अध्यक्ष बंटी पाटील, कार्याध्यक्ष मधुकर पाटील, तालुका उपाध्यक्ष बबन जामदार, बाबासाहेब पाटील, संजय नाईक, मारुती लाड, सुरेश पाटील, बजरंग पाटील, कुमार पाटील, राजू पाटील, नामदेव साळुंखे, सागर पाटील, शिवाजी वाडेकर, चिनू कुळवमोडे यांच्यासह रयत संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

बोरगाव येथील धनगरी ढोलवादन स्पर्धेत निडगुंदी येथील ‘बेंकी बबलादी’ मंडळ सर्वोत्तम

Spread the love  निपाणी (वार्ता) : बोरगाव येथील वाशीखान वालुग मंडळातर्फे वाशिखान मंदिरात सहकाररत्न उत्तम …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *