Saturday , September 21 2024
Breaking News

बोरगाव विविधोद्दीश संघाला १.४३ कोटीचा नफा

Spread the love

 

अध्यक्ष उत्तम पाटील; जिल्ह्यात सर्वाधिक पत

निपाणी (वार्ता) : शेतकऱ्यांचे हित जपत बोरगाव येथील विविधोद्दीश प्राथमिक ग्रामीण कृषी सहकारी संघाच्या कृषी सहकारी संघाने उत्तम प्रगती साधली आहे. २०२३-२४ आर्थिक वर्षात संघाला १ कोटी ४३ लाखांचा नफा झाल्याची माहिती कृषी संघाचे अध्यक्ष उत्तम पाटील यांनी दिली. शनिवारी (ता.२७) संस्थेच्या कार्यालयात आयोजित बैठकीत ते बोलत होते.
उत्तम पाटील म्हणाले, कृषी संघाने आजपर्यंत शेतकऱ्यांचे हित जोपासत सहकार क्षेत्रात वेगळी छाप निर्माण केली आहे. शेतकऱ्यांच्या आर्थिक प्रगतीसाठी संचालक मंडळ व कर्मचा-यांच्या योग्य नियोजनामुळे संघाच्या शेतकऱ्यांना संघाकडून विविध प्रकारचे प्रकारचे प्रकारचे लाभ होत आहेत. एकूण २९९७ सभासद, २ कोटी ५२ लाख भाग भांडवल, ५१ कोटी ७० लाख ठेवी, ९ कोटी ६४ लाखांवर निधी असून सभासदांना जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून १८ कोटी ९४ लाखांचे कर्ज देण्यात आले आहे. ५४ कोटी ४८ लाख सभासद कर्ज असून ३६ कोटी ८ लाखाची गुंतवणूक केली आहे. ८५ कोटी ६ लाखावर खेळते भाग भांडवल, ३६५ कोटी २ लाखावर वार्षिक उलाढाल झाली आहे. कर्जाची ९५.४० टक्के वसुली झाली आहे. ०% टक्के एनपीए असून आर्थिक वर्षात संघास १ कोटी ४३ लाखांचा नफा झाला आहे.
संघाचे सीईओ आर टी. चौगुला यांनी, विविध संकटात संघाचे सभासद, खातेदार, कर्जदार, हितचिंतक यांना आर्थिक आधार देण्याचा प्रयत्न सातत्याने केला आहे. संघाकडून स्टेशनरी, खत, बियाणे, गारमेंट अशा विविध व्यवसाय प्रारंभ करून रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली आहे. शेतकऱ्यांसाठी जैन ड्रिप इरिगेशन सेवा चालू केली आहे. संस्थेचा कारभार संगणकीकृत करण्यात आला आहे. शुद्ध पाणी पिण्याचे घटक, विमा संरक्षण, महिलांना गारमेंटचा व्यवसाय, सिंधू सेवा अशा अनेक योजना राबविल्या जात आहेत. संस्थेच्या कामकाजाबाबत अनेक पुरस्कारही लाभले आहेत.
शहर व परिसरातील नागरिकांसाठी संघाकडून रुग्णवाहिका प्रारंभ करून सामाजिक बांधिलकी जपल्याचे सांगितले.
बैठकीस संघाचे उपाध्यक्ष सुमित रोड्ड, संचालक रावसाहेब चौगुले, बाळासाहेब सातपुते, प्रदीप माळी, सुमित रोड्ड, प्रवीण पाटील, अशोक माळी, तैमुर मुजावर, राजेंद्र ऐदमाळे, सुनिता बंकापुरे, राजू गजरे, प्राजक्ता पाटील,मुख्य कार्यनिर्वाहक आर. टी. चौगुला यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

भावनेवर नियंत्रण ठेवून अभ्यासाकडे लक्ष द्या

Spread the love  डॉ. स्पुर्ती मास्तीहोळी; क्रीडा, सांस्कृतीक कार्यक्रमाचे उ‌द्घाटन निपाणी (वार्ता) : कुमार अवस्थेत …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *