Friday , November 7 2025
Breaking News

बोरगाव येथे ऊसतोड मजुराची गळफास घेऊन आत्महत्या

Spread the love

निपाणी (वार्ता) : बोरगाव येथील शिरदवाडे मळा येथे झाडाला गळफास घेऊन ऊसतोड मुजराने आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली. चंद्रसेन बाजीराव भावली (वय 38 रा. धनगरवाडी मंजरथ ता. माजलगाव) असे आत्महत्या केलेले ऊसतोड मजुराचे नाव आहे.
याबाबत घटनास्थळावरून व पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी, दीड महिन्यापूर्वी आपल्या कुटुंबीयांसमवेत चंद्रसेन भावली बोरगाव येथे ऊसतोड करण्यासाठी दाखल झाला होता. चिकोडी येथील दुधगंगा कृष्णा सहकारी साखर कारखान्यास ऊसतोड सुरू होती. सायंकाळी बाहेर पडलेला चंद्रसेन याने बोरगाव शहरापासून सुमारे तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या शिरदवाडे यांच्या शेतातील एका झाडाला दोरीच्या सहाय्याने गळफासाने आत्महत्या केली. दरम्यान सकाळी चंद्रसेन याच्या पत्नीने शोधशोध केली असता चंद्रसेन याने आत्महत्या केल्याचे उघडकीस आले. मृत चंद्रसेन याच्या मागे पत्नी, दोन मुले असा परिवार आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस सहायक एम . ए. जमादार व कडबी यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. सदलगा पोलीस ठाण्यात पत्नी इंदुबाई भावली यांनी फिर्याद दाखल केली असून अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक रवींद्र अजन्नावर हे करीत आहेत. सायंकाळी उशिरा विच्छेदन मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. आत्महत्येचे कारण समजू शकलेले नाही.

About Belgaum Varta

Check Also

निपाणी परिसरात गोरज मुहूर्तावर उडाला तुळशी विवाहचा बार

Spread the love  भटजी ऐवजी मोबाईल वरील मंगलाष्टिका निपाणी (वार्ता) : विवाह इच्छुकांनी गुडघ्याला बाशिंग …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *