

निपाणी : शहरात विविध संघ अशा संस्था आणि शासकीय कार्यालयांच्या ठिकाणी प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहण करण्यात आले. येथील बेळगाव नाक्यावरील हुतात्मा स्मारकाजवळ रयत संघटनेचे चिकोडी जिल्हा अध्यक्ष राजू पोवार यांच्या हस्ते स्मारकाचे पूजन झाले. दीपक इंगवले, उमेश भारमल, रविंद्र पावले, सर्जेराव हेगडे, भगवान गायकवाड, बाळासाहेब कळसकर यांच्या प्रमुख उपस्थितीत सामाजिक कार्यकर्ते सुधाकर माने यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
येथील जमियते उलेमा ए हिंद वतीने प्रजासत्ताक दिनानिमित्त संघटनेच्या कार्यालयात ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते शौकत जमादार, डॉ. फजल पिरजादे, संघटनेचे संघटनेचे अध्यक्ष हाफिज खलील नणदी, मौलाना ईलियास, रिजवान जमादार यांच्या प्रमुख उपस्थितीत ध्वजारोहण करण्यात आले.
उत्तर कर्नाटक रिक्षा चालक संघाच्या निपाणी तालुका विभाग शहर मध्यवर्ती रिक्षा चालक मालक संघटनेतर्फे नरवीर तानाजी चौकात गुरुकुल करिअर अकॅडमीचे संस्थापक मेजर चारुदत्त पावले यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. मध्यवर्ती रिक्षा चालक-मालक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या प्रमुख उपस्थितीत कायदे सल्लागार ऍड. प्रवीणकुमार जोशी यांच्याहस्ते ध्वज पूजन करण्यात आले. येथील भागीरथीबाई शाळा कन्या शाळेत मुख्याध्यापिका के. एल. चिंगळे यांच्या प्रमुख उपस्थितीत संस्थेचे खजिनदार अनिलकुमार मेहता यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. येथील हरिनगर प्राथमिक शाळेत प्रणव मानवी, सोनाली उपाध्ये व मान्यवरांच्या उपस्थितीत प्रभाकर पाटील यांच्या हस्ते ध्वज पूजन तर नगराध्यक्ष जयवंत भाटले यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. येथील मॉडर्न इंग्लिश स्कूल मध्ये प्राचार्य स्नेहा घाटगे यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले.