
खानापूर : प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र एकीकरण युवा समितीतर्फे बुधवारी हलशीवाडी, हलशी व गुंडपी येथील सरकारी मराठी शाळेत शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले.
हलशीवाडी येथे शाळा सुधारणा कमिटीचे अध्यक्ष विनोद देसाई यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले त्यानंतर निवृत्त जवान विलास देसाई, शुभम देसाई, विनायक देसाई यांच्या हस्ते इयत्ता पहिली व दुसरीतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले.

मिलिंद देसाई यांनी युवा समितीतर्फे राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांची माहिती दिली. मुख्याध्यापक के. एच. जाधव यांनी स्वागत केले. यावेळी सह शिक्षिका बिनीता गोलमेट, केशव देसाई, संजय देसाई आदी उपस्थित होते
गुंडपी शाळेचे मुख्याध्यापक दत्तात्रय देसाई यांनी युवा समितीच्या कार्याचे कौतुक करीत पालकांनी विद्यार्थ्यांना मराठी शाळेत पाठवून देणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त केले. त्यानंतर विलास देसाई, मारुती पाटील, विनायक पाटील, मोहन पाटील, भाग्यश्री पाटील, दर्शना पाटील, राजश्री पाटील, एस. बी. गौडण्णवर यांच्या हस्ते साहित्य वितरण करण्यात आले.
हलशी येथील प्राथमिक मराठी शाळेमध्ये शैक्षणिक साहित्य वितरण करण्यात आले. प्रारंभी महात्मा गांधी व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. मुख्याध्यापक एल. डी. पाटील यांनी युवा समितीकडून दरवर्षी शाळांना मदत केली जात आहे त्याचा विद्यार्थ्यांना लाभ होत असून मराठी शाळांमध्ये विद्यार्थी वाढीसाठी हा उपक्रम उपयोगी ठरत असल्याचे मत व्यक्त केले.
यावेळी शाळा सुधारणा श्रीकांत गुरव, सुभाष हट्टीकर, शिवाजी कदम, शांताराम कदम, महादेव जाधव, लक्ष्मी हलगेकर, रेखा पाटील, नरशिंग घाडी, गणपती पाटील, किरण पेडणेकर रामू जुंझवाडकर, सह शिक्षक
सहदेव चवलगी, व्ही. एस. माळवी, एम. डी. मधाळे, एस. आर. पाटील, जी. एन. घाडी, एस. एस. गौडा आदी उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta