वितरक गजेंद्र तारळे यांची माहिती
निपाणी (वार्ता) : गॅस कनेक्शन धारकांना केवायसी करणे अनिवार्य करण्यात आले आहे. मात्र केवायसीकडे ग्राहकांनी पाठ फिरविली आहे. अनेकांची केवायसी रखडल्याने डाटा अपडेट करताना अडचणी येत आहेत. केवायसी न केल्यास गॅस कनेक्शन आणि सबसिडी बंद होणार असल्याची माहिती येथील गॅस वितरक गजेंद्र तारळे यांनी दिली.
केवायसी करण्यासाठी गॅस ग्राहकांना सूचना करण्यात आल्या होत्या. पण अजूनही अनेक नागरिकांचे केवायसी करणे शिल्लक आहे.सर्वच गॅसधारकांना केवायसी करणे अनिवार्य आहे. केवायसी न करणाऱ्या नियमित ग्राहकांना तसेच उज्ज्वला योजनेच्या गॅस कार्डधारकांना ३०० रुपये सबसिडी बंद होण्याची शक्यता आहे. त्यामुळे गॅससेवेचा लाभ घेणाऱ्या सर्व ग्राहकांनी केवायसी करून घ्यावी.केवायसी नसल्यास सबसिडीसह इतर बाबी मिळणार नाहीत. गॅस धारकांनी एजन्सीमध्ये जाऊन केवायसी करून घ्यावी. त्यासाठी आधार कार्ड, मोबाइल क्रमांक, गॅस जोडणी ग्राहकांचे पुस्तक, ग्राहकांचे फेस रीडिंग किंवा अंगठ्याचा ठसा हे पर्याय उपलब्ध आहेत. त्यामाध्यमातून केवायसी केवायसी करून घेण्याची आवाहन तारळे यांनी केले आहे.