मीनाक्षी पाटील : वीतराग महिला मंडळातर्फे हळदीकुंकू
निपाणी (वार्ता) : मोबाईल व पाश्त्यात संस्कृतीमुळे देशाची अवस्था पुन्हा आधारलेली असून स्त्रियांवर होणार्या अत्याचाराच्या घटना वाढलेल्या दिसत आहेत. त्यामुळे अशा अत्याचार संपविण्यासाठी महिलांनी एकत्रित येऊन पुन्हा एकदा मोठा संघर्ष करण्याची गरज आहे, असे मत ज्येष्ठ समाजसेविका मीनाक्षी पाटील यांनी व्यक्त केले. बोरगाव येथील पार्श्वनाथ जैन मंदिर येथे वीतराग महिला मंडळाच्या वतीने आयोजित हळदीकुंकू कार्यक्रम व महिलांच्या सत्कार कार्यक्रमाप्रसंगी अध्यक्षस्थानावरून मीनाक्षी पाटील बोलत होत्या.
मीनाक्षी पाटील म्हणाल्या, सध्याच्या काळात कुटुंबातील सुसंवाद हरवत चाललेला आहे. तो वाढला पाहिजे. तरच आपले कुटुंबावर चांगले संस्कार होणार आहे. मोबाईल संस्कृती वाढली आहे. इंटरनेटचा अतिवापरच्या विळख्यात सापडलेल्या तरुण, विद्यार्थी वर्गाला वाचविण्यासाठी विशेषत: महिलांनी दक्ष राहणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांवर सुसंस्कार करण्याची जबाबदारी ही प्रत्येक महिलांची आहे. यासाठी महिलांनी हे प्रामुख्याने आपल्या कुटुंबावर चांगले संस्कार होईल असे कार्य करावे. आपल्या कर्तृत्वातून आपला कुटुंबातील संस्कार बिघडणार नाहीत, याची दक्षता प्रत्येक महिलांनी घेतली पाहिजे. तरच समाजात आपले कुटुंब संस्कारीत राहील. जगातील कोणताही विषय अवघड नाही पण त्यासाठी आपण कष्ट केले पाहिजे.
अभ्यास, निरीक्षण, कष्ट व संस्कार ही कष्टाची साधने आहेत. ती महिलांनी आपल्या कुटुंबात उपलब्ध करून द्यावीत. आपण जे चांगले करायचे आहे ते मनाशी ठरविले पाहिजे. महिलांनी सकारात्मक दृष्टिकोन ठेवला तर कुटुंबाचा पर्यायाने समाजाचा विकास होण्यास मदत होत असतो. यासाठी महिलांनी आपली सर्व जबाबदारी ओळखून कुटुंबात समाजात कार्य करावे असे शेवटी मीनाक्षी पाटील यांनी सांगितले.
महिला मंडळाच्या संचालिका धनश्री पाटील यांनी, महिलां मधील सुसंवाद वाढावा व त्यांच्या प्रत्येक गोष्टीची देवाणघेवाण व्हावी, यासाठी प्रत्येक वर्षी वितराग महिला मंडळाच्या वतीने हळदीकुंकू कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. पण गेल्या दोन वर्षापासून कोरोना संकट आल्याने साध्या पद्धतीने या ठिकाणी हळदीकुंकू कार्यक्रम साजरा करण्यात येत आहे. हळदीकुंकूच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने महिलांना एकत्रित आणून त्यांच्या अंगी असलेल्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी मीनाक्षी पाटील यांच्या नेतृत्वाखाली गेल्या अनेक वर्षापासून हे कार्य करीत असल्याचे सांगितले.
कार्यक्रमास विनयश्री पाटील, सुजाता पाटील, शोभा हवले, आशाराणी पाटील, उज्वला पाटील, भारती पाटील, सन्मती पाटील, सरोजनी करोले, आशाराणी तमन्नावर, विनयश्री मगदूम, अनिता मगदूम यांच्यासह वितरक महिला मंडळाच्या पदाधिकारी व सभासद उपस्थित होत्या.
Check Also
सीमाभागात रोजगार मेळावा घेण्याबाबत संजय मंडलिक यांचे महाराष्ट्र शासनाला पत्र
Spread the love निपाणी : येथे महाराष्ट्र शासनातर्फे सीमाभागातील बेरोजगार तरूणांसाठी शिवजयंतीचे औचित्य साधून रोजगार …