परिसरातून कौतुक : जिद्दीच्या जोरावर मिळवले यश
निपाणी (विनायक पाटील) : विज्ञान विभागात उच्चशिक्षित होऊन ही पोलिस बनण्याचे स्वप्न असल्याने गेल्या दोन वर्षापासून जिद्द, चिकाटी, व कष्टाने अभ्यास करीत परिश्रम घेतल्याने कितनी कलेक्टरचा मुलगा पोलीस बनला आहे. बोरगाव येथील युवक शुभम बाहुबली रोड्ड यांनी आपले स्वप्न सत्यात उतरविले आहे. त्यांची राज्यातील पडू याठिकाणी सिव्हिल पोलिस म्हणून नियुक्ती झाली आहे.
वडील बाहुबली रोड्ड हे बोरगावमधील शेतकरी व शहरातील कर्नाटक विकास बँकेत पिग्मी कलेक्टर म्हणून काम करीत आहेत. आपली मुले ही उच्चशिक्षित व्हावेत, यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून परिश्रम घेत आहेत. त्यांनी घेतलेले परिश्रम पाहून शुभम याने आपणही सरकारी सेवेत रुजू व्हावे, यासाठी पोलिस बनण्याचे स्वप्न पाहिले. त्याप्रमाणे त्यांनी वाटचाल सुरू केली.
शहरातील के.एस.पाटील या शाळेत प्राथमिक व विद्यासागर शाळेत माध्यमिक शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर निपाणी येथील जी. आय. बागेवाडी महाविद्यालयात बी.एस्सी पदवी पूर्ण केली. हे करीत असताना स्पर्धा परीक्षेचे ज्ञान मिळवून विविध ठिकाणी जाऊन मार्गदर्शन मिळवले. धारवाड येथे कोचिंग सेंटरला प्रवेश मिळवून पोलीस भरतीचे प्रशिक्षण घेतले. त्यानंतर कोरोनामुळे गेल्या दोन वर्षापासून घरीच राहून अध्ययन केले. गेल्या महिन्यात मुडबिद्री येथे पोलीस भरतीसाठी परीक्षा दिली. त्यानंतर कोडगु येथे शारीरिक परीक्षाही दिली होते. या दोन्ही परीक्षेचा निकाल लागून निकालात शुभम यांचे कोडगु येथे पोलिस दलात सिव्हिल पोलिस म्हणून नियुक्ती झाली आहे.
त्यांनी पाहिलेले स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी शुभम यांची धडपड याठिकाणी सार्थक ठरल्याने आपणास समाधान वाटत असल्याचे मत वडील बाहुबली यांनी यावेळी व्यक्त केले.
—
’आजच्या युवकांनी स्पर्धा परीक्षेचे ज्ञान मिळवून सैन्यदलात किंवा पोलिस दलात भरती होण्यासाठी प्रयत्न करावेत. मनाशी जिद्द बाळगून आपण प्रामाणिक प्रयत्न केले तर यश नक्कीच मिळत असते. असेच मी प्रयत्न केल्याने आज पोलीस दलात भरती झालो. यामागे माझे आई, वडील यांची मोलाची साथ मला मिळाली आहे. युवकांनी देशसेवेसाठी प्राधान्य देऊन सैन्य दला बरोबरच पोलीस दलातही भरती व्हावे. मी यापुढे सर्वसामान्य लोकांना व नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करणार असून पोलिस दलात पुढे उच्च अधिकारी होण्याचेही माझे स्वप्न आहे.
– शुभम रोड्ड, बोरगाव
