संकेश्वर (प्रतिनिधी) : संकेश्वर श्री शंकरलिंग रथोत्सवाला आडकाठी आणाल तर तिव्र आंदोलन छेडण्याचा इशारा श्रीरामसेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रमोदजी मुतालिक यांनी दिला आहे. त्यांनी संकेश्वर ग्रामदैवत श्री शंकराचार्य संस्थान मठाला धावती भेट देऊन देवदर्शन घेऊन श्री शंकराचार्य महास्वामीजींचा आर्शीवाद घेतला. तद्नंतर प्रसार माध्यमांशी बोलताना प्रमोदजी मुतालिक म्हणाले केंद्रात आणि राज्यात भाजपाचे हिंदुत्व सरकार आहे. हिंदुत्व सरकारने हिंदुंच्या धार्मिक कार्यक्रमांना प्रोत्साहन देण्याचे कार्य करायला हवे आहे. पण सरकारची निती हिंदूंच्या विरोधात दिसत आहे. सरकार राजकीय सभा समारंभाला, राजकीय व्यक्तींच्या विवाह सोहळ्याला, वाढदिवस कार्यक्रमाला अनुमती देण्याचे कार्य करीत आहे.सरकारला धार्मिक कार्यक्रमांना तेवढेच कोरोना नियम लागू करावयाचे असेल तर आम्ही गप्प बसणार नाही. संकेश्वर श्री शंकरलिंग रथोत्सवाला कोणी आडकाठी आणण्याचे कार्य केले तर आपण भक्तगणांना, शेतकर्यांना, कलाकारांना सोबत घेऊन आंदोलन छेडणार असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी गंगधरजी, श्रीरामसेना हुक्केरी तालुका अध्यक्ष सुभाष कासारकर, नेताजी आगम, विनायक भोसले, विकास ढंगे उपस्थित होते.
