दोन महिन्याचा उलटला काळ; पूर्वीप्रमाणे कॅमेरे लावण्याची मागणी
निपणी (वार्ता) : नगरपालिकेतील कारभार पारदर्शक व्हावा, अधिकाऱ्यांचे कर्मचाऱ्यावर नियंत्रण राहावे, यासाठी नगरपालिकेमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. पण लोकसभा निवडणुकीत मतदाना दिवशी कार्यालयातील सर्व सीसीटीव्ही कॅमेरे बंद केले पण मतदान होऊन दोन महिन्याचा काळ उलटला तरीही कॅमेरे बंदच असल्याने नागरिकातून संताप व्यक्त होत आहे.
येथील नगरपालिकेतील विविध कार्यालयात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. सर्व कार्यालयातील नियंत्रण येथील आयुक्तांच्या कार्यालयात राखले जाते. सीसीटीव्हीमुळे कोणत्या ठिकाणी गर्दी आहे, नागरिकांची सोय, गैरसोययीसह अधिकारी व कर्मचारी काय करत आहेत याची माहिती मिळते. त्यामुळे प्रत्येक कार्यालयात सीसीटीव्ही बसविण्यात आले आहे.
लोकसभा निवडणूक होऊन दोन महिने उलटूनही पुन्हा सीसीटीव्ही जोडण्याचे कोणत्याही अधिकाऱ्याच्या लक्षात आलेले नाही. त्यामुळे कार्यालयात मी कामासाठी येणाऱ्या नागरिकांनी ही बाब संबंधित कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या नजरेस आणून दिली आहे.
लोकसभा निवडणुकीतील मतदाना दिवशी गुप्त मतदान असल्याने सीसीटीव्ही बंद करणे योग्य आहे. पण दोन महिन्यापासून ही यंत्रणा बंद ठेवली आहे. तात्काळ सीसीटीव्ही यंत्रणा सुरू करावी, अशी मागणी शासन नियुक्त नगरसेवक ॲड. एस. एस. चव्हाण यांनी केली आहे.