निपाणी (वार्ता) : गळतगा आणि मानकापूर येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती साजरी करण्यात आली. त्यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
गळतगा येथील ग्राम पंचायत कार्यालयात मान्यवरांच्या हस्ते अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन झाले. यावेळी माजी जिल्हा पंचायत सदस्य राजेंद्र पवार- वड्डर, ग्रामपंचायत अध्यक्ष राजु पाटील, उपाध्यक्ष लखव्वा हुनसे, सदस्य प्रवीण विजयनगरे, शशिकांत पाटील, बाळू सदलगे, श्रावण ऐवळे, राजू बडीगेर, अवधूत केंगारे, धीरज कर्वे, राहुल वाकपट्टे, संभाजी खोपडे, भरत शाहमाने, सुधीर ऐवाळे, दगडू वड्डर उपस्थित होते.
मानकापूर येथे अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते यांच्या साठे यांच्या पुतळ्यासह छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी माजी जिल्हा पंचायत सदस्य राजेंद्र वडर, ग्रामपंचायत अध्यक्ष सुनील म्हाकाळे, बेळगांव जिल्हा अनुष्ठान कमिटी उपाध्यक्ष अमोल बन्ने, ग्राम पंचायत सदस्य प्रमोद शेवाळे, वैशाली कुंभार, लक्ष्मण माने, धनंजय माने, लक्ष्मण माने, वैभव लोखंडे, यश माने, मोहन माने, प्रभुदास माने, कुंदन माने यांच्यासह लोकशाहीर आण्णाभाऊ साठे युवा मंचे पदाधिकारी व मातंग समाज बांधव उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta