सौदलगा : सौदलगा सरकारी मराठी मुलांच्या शाळेतील इयत्ता पाचवीचा विद्यार्थी वैभव विजय कोळी, आदर्श भिलुगडे आणि मंजु पिंटू भानसे या मुलांनी शाळा कॅम्पसमध्ये एस. एम. पोळ, (तलाठी) साहेब यांची हरवलेली रक्कम सापडताच शाळेचे शारिरीक शिक्षक विनय भोसले यांचेकडे सुपूर्द करताच सरांनी शाळेच्या मुख्याध्यापक आणि स्टाफशी संपर्क साधला. वेळीच मुलांचे कौतुक करत विचार विनिमय करून तलाठी साहेबांशी बातचीत करून रक्कम त्यांचीच आहे. अशी खात्री पटताच मुलांना योग्य बक्षीस देऊन ती परत केली मा. पोळ साहेबांनी शाळेला देणगी देऊन सौदलगा शाळा उत्तम संस्काराचे माहेर घर म्हणून शाळेचे हृदयपूर्वक समाधान व्यक्त केले. या विषयी शाळा अभिवृध्दी आणि देखभाल समितीचे अध्यक्ष शंकर कदम, उपाध्यक्षा तब्बसुम मुल्ला आणि सदस्य, सदस्या यांनीही अभिनंदन केले.
शाळेचे आणि मुलांचे सर्व परिसरात कौतुक होत आहे. सदर प्रामाणिक पणा विषयी शाळा प्रार्थना परिपाठ वेळी मुलांचे खुप खुप आभिनंदन केले. या चांगुलपणा विषयी सर्वच मुलांनी यांचा आदर्श घेण्याची प्रतिज्ञा केली.
यावेळी शाळेचे मुख्याध्यापक धनंजय ढोबळे, सुमन जिरगे, अनिल शिंदे, विनय भोसले, स्वाती व्हरकट, अश्विनी खोत, लता शेवाळे, वीना महेंद्रकर, अमिता करनुरकर, तसेच कन्नड शाळेचा स्टाफ उपस्थित होता.
