निपाणी (वार्ता) : नगरपालिकेत गेल्या ६ वर्षांपासून कोणत्याही सत्तास्थाने नसतांना प्रभाग क्र. १९ च्या सर्वांगीण विकासासाठी आपण सतत प्रयत्नशील आहे. सध्या सार्वजनिक शौचालया साठी २० लाखाचा निधी मंजूर करून आणला आहे. निविदा प्रक्रिया झाले असून लवकरच या कामालाही प्रारंभ होणार असल्याची माहिती नगरसेवक शौकत मणेर यांनी दिली.
ते म्हणाले, जुना प्रभाग क्र. ३ आणि सध्या १९ प्रभाग मधील न्यू संभाजी नगर, संभाजी नगर, टीचर्स कॉलनी, सरकार कॉलनी हा उपनगरीय परिसर विकासापासून वंचित होता. मात्र, आपण येथील नगरसेवक झाल्यावर येथील विकासकामे करण्यासाठी सतत कार्यरत आहोत. संभाजी नगर येथील दोन गल्लीत पेव्हर ब्लॉकचे काम करण्यात आले आहे. चार गल्ल्यांमध्ये डांबरीकरण करण्यात आले. तर, नवीन संभाजी नगर मध्ये नवीन रस्ता निर्माण केला.
येथील पाण्याची समस्या सोडविण्यासाठी कुपनलिकेची खुदाई केली. तरीही या भागात असलेल्या विहीरीची स्वच्छता करून ते पाणी घरोघरी पोहचवण्यासाठी काम केले. नागरिकांची अत्यावश्यक गरज असलेल्या सार्वजनिक शौचालयासाठी अखंडपणे पाठपुरावा करून २० लाख रुपयांची मंजुरी गेल्या ९ महिन्यांपूर्वी मिळविली. त्याच्या तांत्रिक बाबी पूर्ण होवून निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असून लवकरच या कामाला सुरुवात होणार आहे. मात्र याबाबत नागरिकांची दिशाभूल करण्याचे काम कांहीकडून होत आहे.
प्रभागातील नागरिकांनी दिलेल्या मतदानाच्या आशिर्वादाने गेली ७ वर्षे कोणतेही सत्तास्थाने नसतांना प्रभागातील नागरिकांच्या संपर्कात राहून त्यांच्या समस्या जाणून त्या सोडविण्यासाठी ज्येष्ठ आणि सहक-यांच्या पाठबळावर कार्यरत असल्याचे ही नगरसेवक शौकत मणेर यांनी सांगितले.
