Saturday , July 27 2024
Breaking News

सौंदलगा येथील सरकारी शाळेमध्ये क्रिडा स्पर्धा संपन्न

Spread the love

सौंदलगा : निरोगी शरीर आणि मन निर्माण होण्यासाठी खेळ फार महत्त्वाचे असे प्रतिपादन एसडीएमसी अध्यक्ष अजित कांबळे यांनी २०२१-२२ या सालातील शालेय वार्षिक क्रीडा स्पर्धाचे उद्धघाटन करून केले. क्रीडा स्पर्धा येथील सरकारी उच्च प्राथमिक मराठी मुलींची शाळेमध्ये मोठ्या उत्साहात संपन्न झाल्या.
बौद्धिक विकासाबरोबरच मानसिक आणि शारीरिक विकास फार महत्त्वाचा असल्यामुळे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी खेळ फार महत्त्वाचे आहेत. खेळामुळेच सांघिक भावना, सहकार्याची भावना आणि खिलाडूवृत्ती मुलांच्यामध्ये विकसित करता येते. म्हणूनच खेळांना प्राधान्य दिले पाहिजे, असे मत एसडीएमसीचे अध्यक्ष अजित कांबळे यांनी येथील वार्षिक क्रीडा स्पर्धेच्या उद्घाटनाप्रसंगी व्यक्त केले.

यावेळी विद्यार्थिनींना खेळाचे महत्व याची गरज या विषयी मार्गदर्शन सुद्धा करण्यात आले. या प्रसंगी विद्यार्थिनींनी रेखाटलेल्या खेळावर आधारित रांगोळी प्रदर्शनाचे उद्घाटन एसडीएमसीचे उपाध्यक्ष सागर चौगुले यांच्या हस्ते करण्यात आले. या वार्षिक क्रीडा स्पर्धेमध्ये शाळेतील जवळपास सर्वच विद्यार्थिनींनी आपला सहभाग नोंदवला होता. यामध्ये पळण्याच्या स्पर्धा १०० मीटर श्रावणी कुंभार, २०० मीटर श्वेता खराडे, ४०० मीटर सानिका माळी, ६०० मीटर सानिका माळी, गोळा फेक सानिका आडसूळ, थाळीफेक गायत्री पाटील, अडथळा शर्यत गंगाई बोरगुंडे, बुद्धिबळ स्पर्धेत श्रद्धा चौगुले, रांगोळी स्पर्धेत प्रिती मोहिते आणि स्वागता शेवाळे यांनी प्रथम क्रमांक पटकाविला, तर कबड्डी पी. टी. उषा ग्रुप आणि रिले सानिया मिर्झा ग्रुप यांनी प्रथम क्रमांक मिळविले. जनरल चॅम्पियनशिप सानिका माळी पटकावली. क्रीडा स्पर्धेच्या दरम्यान बीआरसी प्रमुख खानापुरे सर, बीआरपी डी. डी. शिंदे सर तर सौंदलगा सीआरसी प्रमुख एम. एच. कटगेरी यांनी भेट दिली. विद्यार्थिनींना क्रीडा प्रतिज्ञा क्रीडा शिक्षक एस. एन. बुरलट्टी यांनी दिली. कार्यक्रमाचे स्वागत आणि प्रास्ताविक शाळेच्या मुख्याध्यापिका एस. जे. मेस्त्री यांनी केले, सूत्रसंचालन संतोष पाटील तर आभार व्ही. एम. नेजकर यांनी मानले.

यावेळी एसडीएमसीचे सदस्य दत्तात्रय कुंभार, शिवाजी हातकर, सुरेश लोखंडे, दिपाली पाटील, राणी मेस्त्री, वैशाली कुंभार, अश्विनी शिगावे, महादेवी साळुंखे, सलमा नदाफ, अनिल मोरे, सेवानंद साळुंखे, आझाद नदाफ आदी मान्यवर उपस्थित होते. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी व्ही. आर. पाटील, एस. के. मगदूम, एस. जी. बाकळे, एस. आर. परीट, एस. डी. चौगुले, प्रगती कांबळे आदी शिक्षकांनी विशेष परिश्रम घेतले.

About Belgaum Varta

Check Also

शेतकरी वाहनांना टोल माफी मिळावी

Spread the love  रयत संघटनेची मागणी; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन निपाणी (वार्ता) : बेळगाव जिल्ह्यातील अनेक शेतकरी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *