बेळगाव : कर्नाटक श्रमिक पत्रकार संघटनेच्या बेळगाव जिल्हा अध्यक्षपदी ज्येष्ठ पत्रकार दिलीप कुरुंदवाडे यांची बिनविरोध निवड झाली आहे.
कर्नाटक श्रमिक पत्रकार संघटनेच्या बेळगाव जिल्हा शाखेच्या सर्वच नूतन पदाधिकार्यांची निवड अविरोध झाली आहे. संघटनेच्या गौरवाध्यक्षपदी भीमशी जारकीहोळी यांची निवड करण्यात आली आहे. बेळगावमध्ये आज सदर संघटनेच्या नव्या कार्यकारिणीची निवड प्रक्रिया पार पडली. कार्यकारिणीच्या 15 जागांसाठी 16 जणांनी नामांकन अर्ज दाखल केले होते. नामांकन अर्ज मागे घेण्याच्या आज शनिवारी शेवटच्या दिवशी महारुद्र महालमनी यांनी आपला अर्ज मागे घेतल्यामुळे कार्यकारणीवरील सर्व पदाधिकारी सदस्यांची निवड बिनविरोध झाली.
संघटनेच्या जिल्हा उपाध्यक्षपदी इन बेळगावचे राजशेखर पाटील, यल्लाप्पा तळवार व श्रीशैल मठद, सरचिटणीसपदी अरुण सी. पाटील, कार्यदर्शीपदी श्रीकांत कुबकड्डी, ईश्वर होटी व तानाजीराव मुरंकर यांची तर खजिनदारपदी चेतन होळ्याप्पगोळ यांची निवड करण्यात आली आहे.
राज्य कार्यकारी समिती सदस्यपदी मल्लिकार्जुन गुंडी यांची तर जिल्हा कार्यकारी समिती सदस्यपदी बसवराज होंगल, संजीवकुमार तीलगर, सुनील गावडे, सुरेश बाळोजी, राजेंद्र कोळी, रवी हुलकुंडी, सुकुमार बन्नुरे, सिद्धलिंग पुजेर, सूर्यकांत पाटील, राजकुमार बागलकोट, इरनगौडा पाटील, विक्रम पुजेरी, भीमप्पा किचडी, लीना टोपन्नावर, इराण्णा बुड्डागोळ यांची अविरोध नियुक्ती झाली आहे.
निवडणूक अधिकारी म्हणून ज्येष्ठ पत्रकार जी. के. पुजार यांनी काम पाहिले. निवडणूक पार पडल्यानंतर नूतन अध्यक्ष दिलीप कुरुंदवाडे यांचे पुष्पहार घालून सर्वांनी अभिनंदन केले आणि शुभेच्छा दिल्या.
दिलीप कुरुंदवाडे यांनी अडचणीत संकटात असलेल्या बेळगावातील पत्रकारांसाठी अनेकदा धाऊन जात मदत केली आहे कोविड काळात गरजू अनेक पत्रकार मित्रांना त्यांनी मदत केली होती विशेष म्हणजे बेळगावातील गरजू अश्या कन्नड सोबत मराठी आणि इंग्लिश माध्यमाच्या पत्रकराना त्यांनी मदत केली आहे.
कुरुंदवाडे हे पब्लिक टी व्ही वरिष्ठ पत्रकार असून अनेकदा त्यांनी पत्रकारांचे नेतृत्व केले आहे. या अगोदर देखील त्यांनी संकटात असणाऱ्या सर्वभाषिक पत्रकारांसाठी मदत केली आहे. श्रमिक पत्रकार संघाचे ते अध्यक्ष झाल्याने बेळगावातील पत्रकारांना संघटनात्मकरित्या अच्छे दिन येणार आहेत.