सौंदलगा : सौंदलगा येथील श्री नृसिंह गणेश उत्सव मंडळ येथे शनिवारी (ता.१९) सायंकाळी मोठ्या उत्साहात शिवजयंती साजरी झाली. सौंदलगा येथील परिसरात एक वेगळीच चाहुल असते ती म्हणजे मोटार सायकल तसेच मोठ्या वाहनाना छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा असलेले भगवे ध्वज लावण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती तोंडावर आली असताना येथील बालचमू दोन दिवस अगोदरच शिवजयंतीच्या तयारीला सुरुवात केली होती. मांडव घालणे, छत्रपती शिवाजी महाराजांचे आसन तयार करणे, लायटिंग, फुलांच्या माळांची सजावट, भगवे ध्वज लावणे अशाप्रकारे एक आकर्षक सजावट करून शनिवारी (ता.१९) सायंकाळी छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती बसवून त्यास पुष्पहार घालून त्यांना वंदन, मुजरा करून, ढोल-ताशांच्या गजरात, महाराजांच्या जयघोषात सायंकाळी छत्रपती शिवाजी महाराजांची मिरवणूक काढण्यात आली. त्यानंतर बालचमुनी प्रसाद वाटप केला. यावेळी नृसिंह गणेश उत्सव मंडळाचे बालचमु सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Check Also
सीमाभागात रोजगार मेळावा घेण्याबाबत संजय मंडलिक यांचे महाराष्ट्र शासनाला पत्र
Spread the love निपाणी : येथे महाराष्ट्र शासनातर्फे सीमाभागातील बेरोजगार तरूणांसाठी शिवजयंतीचे औचित्य साधून रोजगार …