Sunday , July 26 2026
Breaking News

मंत्री ईश्वराप्पा यांना मंत्रिपदावरून बडतर्फ करण्याची काँग्रेसची मागणी

Spread the love

बेळगाव : बेळगाव जिल्हा काँग्रेसने, ग्रामीण विकास आणि पंचायत राज्य मंत्री ईश्वराप्पा यांना मंत्रिपदावर बडतर्फ करावे तसेच त्यांच्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे. काँग्रेसच्यावतीने सदर मागणीचे निवेदन बेळगाव जिल्हा प्रशासनातर्फे राज्यपाल गेहेलोत यांना धाडण्यात आले आहे.
ग्रामीण विकास आणि पंचायत राज्य मंत्री के. एस. ईश्वराप्पा यांनी, तिरंगा ध्वजाच्या ठिकाणी भगवा ध्वज फडकवण्याचे वक्तव्य करून राष्ट्रध्वजाचा अवमान केला आहे. त्यांचे हे वक्तव्य बंधुत्वात आणि देशाच्या अखंडतेला तडा देणारे आहे. त्यांच्या वक्तव्याचा गांभीर्याने विचार करून त्यांना मंत्रिमंडळातून डच्चू द्यावा तसेच त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी बेळगाव जिल्हा काँग्रेसच्यावतीने करण्यात आली आहे.
आरटीओ सर्कल येथील काँग्रेस भवन येथून ईश्वराप्पा यांच्या विरोधात घोषणाबाजी करत काँग्रेस कार्यकर्त्यांनी बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा नेऊन जिल्हा प्रशासनाला निवेदन सादर केले. याप्रसंगी बेळगाव जिल्हा ग्रामीण काँग्रेस अध्यक्ष विनय नावलगट्टी, शहराध्यक्ष राजू शेठ यासह अन्य पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

राकसकोप तुडुंब भरण्याच्या उंबरठ्यावर; आता अवघ्या साडेचार फुटांची प्रतीक्षा!

Spread the love  वेस्ट वेअरवरून पाणी वाहू लागले; जुनी २४७० फूट पातळी गाठली बेळगाव : …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *