कोगनोळी : येथील ग्राम पंचायत अध्यक्षा आक्काताई खोत यांनी आपल्या अध्यक्ष पदाचा राजीनामा चिक्कोडी प्रांताधिकारी संतोष कामगौडा यांच्याकडे सोमवार तारीख 21 रोजी दिला.
यावेळी ग्रामपंचायत सदस्य छाया पाटील, सदस्या राजेश्री डांगरे, ग्रामपंचायत सदस्य युवराज कोळी, संजय पाटील आप्पासाहेब खोत आदी उपस्थित होते.
कोगनोळी ग्रामपंचायतीला जनरल महिला अध्यक्षपदासाठी आरक्षण आले होते. यावेळी महिला आरक्षणमधून तीन महिला इच्छुक होत्या.
यामध्ये आक्काताई खोत, छाया पाटील, वनिता खोत यांनी अध्यक्षपदासाठी जोरदार शक्तिप्रदर्शन केले होते. माजी मंत्री वीरकुमार पाटील यादी चिट्टीद्वारे अध्यक्षपदाची निवड केली होती. यावेळी त्यांनी सव्वा वर्षाचा कालावधी देऊन आक्काताई खोत यांची निवड केली होती. आक्काताई खोत यांचा कार्यकाल संपला असल्याकारणाने माजी मंत्री वीरकुमार पाटील यांनी त्यांना आपला अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा असे सांगितले होते. त्याप्रमाणे आक्काताई खोत यांनी आपला अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे.
