श्रीशैल यडहळ्ळी ; बागेवाडी महाविद्यालयात राज्यस्तरीय कार्यशाळा
निपाणी (वार्ता) : आजच्या विद्यार्थ्यांनी त्यांच्यासमोर असलेल्या संधींचा वापर करून भविष्य घडवावे, असे आवाहन
राज्य सहकार विभागाचे जिल्हा प्रशिक्षण अधिकारी श्रीशैल यडहळ्ळीज् यांनी केले. बेळगाव येथील केएलई संस्थेच्या येथील जी. आय. बागेवाडी महा विद्यालयात अर्थशास्त्र आणि वाणिज्य विभागातर्फे आयोजित ‘भारतीय बँकिंग आणि सहकारी क्षेत्रातील नोकरीच्या संधी’ या विषयावरील एक दिवसीय राज्यस्तरीय कार्यशाळेत ते प्रमुख वक्ते म्हणून बोलत ते बोलत होते.
प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते रोपाला पाणी घालून कार्यशाळेचे उद्घाटन करण्यात आले. सृष्टी डोणवडे यांनी स्वागत केले. राजश्री दिवटे यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला.
आंतरराष्ट्रीय पुरस्कार विजेते बसवराज उमराणी यांनी गणित आणि व्यक्तिमत्व विकास यावर सविस्तर माहिती दिली. रसिका नायक यांनी बँकिंग आणि सहकारी क्षेत्रात उपलब्ध असलेल्या विविध नोकरीच्या संधींसाठी आवश्यक असलेल्या तयारीसाठी मानसिक क्षमता आणि आवडीच्या विषयाबाबत विद्यार्थ्यांशी चर्चा करुण मार्गदर्शन केले.
कार्यशाळेत २५० हून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.प्राचार्य डॉ. एम. एम. हुरळी यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यशाळेस आयक्यूएसी समन्वयक डॉ. अतुलकुमार कांबळे, बी. जी. उळेगड्डी, प्रियांका कामत, डॉ. विनोद मगदूम, शंकरमूर्ती के. एन., एस. ए. देशपांडे, नमिता नायक, सविता पाटीलयांच्यासह प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते. साक्षी आणि ईश्वरी यांनी सुत्रसंचलन केले. स्फुर्ती पाटील यांनी आभार मानले.
Belgaum Varta Belgaum Varta